SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
15 ऑगस्टला इचलकरंजीत मोफत 'बिग चेस इंडिपेंडन्स कॅम्प 2026बहुजनांच्या हाताला रोजगार आणि उद्योजक बनवणारी एमआयडीसी उभारण्यात यशस्वी व्हा..'वारणा' ची म्हैस दूध खरेदी दरात प्रतिलिटर दीड रुपया तर गाय दुधास १ रुपया दरवाढ ; आमदार डॉ. विनय कोरे यांची माहितीतरुणांची ऊर्जा आणि देशाचे भविष्य: आंतरराष्ट्रीय युवा दिनलिंगायत समाजाच्या मागण्यांना शासनाचा सकारात्मक प्रतिसाद; प्रशासकीय प्रक्रियेला सुरुवातसंजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागाचा ‘प्रारंभ २०२६’ उत्साहात संपन्नस्वातंत्र्यदिनी ‘असाक्षरमुक्त गाव’ शपथ घेण्याचे आवाहनहॅण्डबॉल क्रीडा प्रबोधिनी प्रवेशासाठी नागपुरात निवड चाचणीदूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशास १० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढकामगारांची आस, शाहू मिलचा श्वास: मिल पुन्हा सुरू करण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्याकडे साकडं

जाहिरात

 

बहुजनांच्या हाताला रोजगार आणि उद्योजक बनवणारी एमआयडीसी उभारण्यात यशस्वी व्हा..

schedule12 Aug 26 person by visibility 125 categoryराज्य

▪️गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजींचा आमदार यड्रावकर यांना आशीर्वाद ; शेला बांधून पेढा भरवत केला सत्कार

जयसिंगपूर : सैनिक टाकळी येथे प्रस्तावित एमआयडीसीमुळे बहुजन समाजातील युवकांच्या हाताला रोजगार मिळणार असून, स्थानिक युवकांना उद्योजकतेची संधी उपलब्ध करून देण्याचे काम तुम्ही करत आहात, असे सांगत गुरूवर्य संभाजी भिडे गुरुजी यांनी प्रस्तावित एमआयडीसीला पूर्णपणे पाठिंबा देवून कोणत्याही परिस्थितीत ही एमआयडीसी उभारण्यात यश मिळू दे, असा शुभाशीर्वाद देत त्यांनी आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या कमरेला शेला बांधून पेढा भरवून श्रीफळ देवून सत्कार केला.

आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी गुरूवर्य संभाजी भिडे  यांची भेट घेऊन सैनिक टाकळी एमआयडीसीबाबतची सविस्तर माहिती त्यांच्यासमोर मांडली. या भेटीत एमआयडीसीचा उद्देश, स्थानिक युवकांना मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी, महिलांसाठी प्रस्तावित गारमेंट क्लस्टर तसेच प्रदूषणविरहित उद्योगांची संकल्पना याबाबत त्यांनी गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजींना माहिती दिली.
‘या एमआयडीसीमुळे बहुजन समाजातील युवकांना रोजगारासोबतच उद्योग-व्यवसायाच्या क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. स्थानिक युवकांना उद्योग उभारण्यासाठी प्राधान्य मिळावे, महिलांना गावाजवळच रोजगार उपलब्ध व्हावा आणि सैनिक टाकळी व परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, हा या प्रकल्पामागील मुख्य उद्देश आहे,’ असे आमदार यड्रावकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

तसेच प्रस्तावित एमआयडीसीमध्ये प्रदूषणविरहित व ग्रीन इंडस्ट्रीला प्राधान्य देण्यात येणार असून, महिलांसाठी गारमेंट क्लस्टर उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे रोजगारनिर्मितीसोबतच महिला सक्षमीकरणालाही चालना मिळणार असल्याचे सांगून एमआयडीसी बद्दल सविस्तर माहिती आमदार यड्रावकर यांनी गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांना दिली. तसेच गावातील युवकांना क्रीडांगण, सैनिकी स्कूल सुद्धा उभारणार असल्याचे सांगितले. 

यावेळी गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, एमआयडीसीच्या मुद्द्यावर काही लोकांनी आपल्याला चुकीची माहिती दिल्यामुळे मी त्यांच्या आंदोलनाला भेट देण्यासाठी गेलो होतो. मात्र, आता एमआयडीसीची वस्तुस्थिती समजली आहे. बहुजन समाजातील युवकांना रोजगार मिळणार, त्यांना उद्योजक होण्याची संधी मिळणार आणि रिकाम्या हातांना काम मिळणार असेल, तर अशा उपक्रमाला आपला सर्वतोपरी पाठिंबा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
बहुजन समाजातील युवकांना उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून सक्षम करण्याचे महत्त्वाचे काम आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर करीत आहेत. या प्रयत्नांना आपला पूर्ण पाठिंबा असून, कोणत्याही परिस्थितीत सैनिक टाकळी येथे एमआयडीसी उभारण्यात त्यांना यश मिळावे, असा आशीर्वाद गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांनी दिला. यावेळी त्यांनी आमदार यड्रावकर यांच्या कमरेला शेला बांधून, पेढा भरवून त्यांचा श्रीफळ देवून गुरुजींनी त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी पी. एल. आंबी, प्रशांत धुळासावंत, प्रद्युम्न आंबी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes