SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार: यशवंतराव चव्हाणकोल्हापूर शहरातील तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी पुलापर्यंत उड्डाण पुल उभारण्याच्या कामाला गती मिळावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणीहातकणंगले पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या अश्विनी बिरांजे तर उपसभापती पदी शिवसेनेचे संतोष कांबळे बिनविरोधटाकाळा माळी कॉलनी येथील राजर्षी शाहू जलतरण तलावाची भाजपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक विजय जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्यासोबत केली पाहणीकोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी विशाल शिराळे, परिवहन समिती सभापतीपदी सत्यजित जाधव, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी कौसर बागवान, उपसभापतीपदी दिपा ठाणेकर यांची निवडनगररचना विभागाकडून आयोजित एक दिवसाच्या विशेष कॅम्पमध्ये 62 प्रकरणे मंजूरसकारात्मकता आणि विश्वास हीच यशाची गुरुकिल्ली : डॉ. ज्ञानवत्सल स्वामी; डी. वाय. पाटील विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत समारंभ उत्साहात; ७४१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान ‘डिपेक्स’मध्ये केआयटी प्रथम राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये वेस्ट मॅनेजमेंट विभागात प्रथम पारितोषिकथकबाकीदार दुकानगाळ्यांवर महापालिकेची कारवाई; कपिलतीर्थ मार्केटमधील 5 गाळे सीलसेवा रुग्णालयात गुरुवारी इपिलेप्सी शिबीराचे आयोजन

जाहिरात

 

कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक : मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त निवडणूक विभागातील 2 हजार 975 अधिकारी व कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना

schedule14 Jan 26 person by visibility 280 categoryमहानगरपालिका

▪️शहरातध्ये 595 मतदान केंद्र सज्ज
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी उद्या शहरातील 595 मतदान केंद्रात निवडणूक होत आहे. यासाठी शहरातील 595 मतदान केंद्रांची तयार करण्यात आली आहे. या मतदानासाठी  नियुक्त 2 हजार 975 अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी मतदानाशी संबंधित अंतिम प्रशिक्षण झाले. यावेळी सर्व मतदान साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. यानंतर सर्व पथके मतदान केंद्राकडे रवाना झाली. सकाळी महासैनिक प्रशिक्षण केंद्र, व्ही.टी.पाटील सभागृह, दुधाळी गांधी मैदान, व हॉकी स्टेडीयम या ठिकाणाहून निवडणूकीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व साहित्य वाटपाच्या कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी व जिल्हा पोलिस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दुपारी साहित्य वाटपाच्या ठिकाणी भेटी दिल्या. या ठिकाणी करण्यात आलेल्या स्ट्राँग रुमची पाहणीही त्यांनी केली.

 मतदान केंद्रांवरील विविध प्रकारच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी 2 हजार 975 अधिकारी व कर्मचारी 595 मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच मतदान प्रक्रियेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिकारी, होमगार्ड, कर्मचारी यांचीही नियुक्त करण्यात आलेली आहे.

   सकाळी फिरतीवेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया पाटील, उप-आयुक्त परितोष कंकाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes