SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफदुधगंगा वगळता 9 नद्यांवरील उपसा बंदी 3 दिवसांसाठी शिथिलपंचगंगा नदीची पाणीपातळी घटल्याने आयुक्त डॉ राजेंद्र भारूड यांची पंपिंग स्टेशनला भेट पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनाकोल्हापूर : महाद्वार रोड व जोतिबा रोड परिसरात अतिक्रमण निमूर्लन कारवाईएमसीईडीमार्फत 'उद्योजकता विकास प्रशिक्षण'चे आयोजनडीकेटीईच्या ३१ विद्यार्थ्यांची मॅक्सीमस इन्फोवेअर कंपनीत निवडकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्या दरम्यान ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधकोल्हापुरात एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमधील चोरीच्या टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कामगिरीअहिल्यादेवींची संघर्षगाथाही समाजासमोर यावी: डॉ. ज्योती जाधवद्वारकानाथ कापूर विद्यालय गंजीमाळ येथे नूतन विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव

जाहिरात

 

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून 70 कर्मचाऱ्यांची मुकादमपदी पदोन्नती; सेवानिवृत्त झालेल्या 29 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार

schedule29 May 26 person by visibility 697 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महानगरपालिकेतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून विविध विभागातील 70 कर्मचाऱ्यांना आज मुकादम पदावर पदोन्नती देण्यात आली. महापालिकेच्या विविध विभागातील वर्ग - 4 मधील कर्मचाऱ्यांना मुकादम पदासाठी पदोन्नती देण्याचे आदेश आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी काढले. शिपाई, पवडी कामागर, झाडू कामगार, सफाई कामगार व पहारेकरी या संवर्गातुन या पदोन्नत्या करण्यात आल्या. यातील सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती आदेश स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेता मुरलीधर जाधव, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी कर्मचारी संघाचे मुख्य संघटक संजय भोसले, अध्यक्ष दिनकर आवळे व कर्मचारी उपस्थित होते.

 आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी दोन दिवसांपूर्वीच कामगार अधिकाऱ्यांना संबंधित प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज या पदोन्नत्या मंजूर करून कर्मचाऱ्यांना पदोन्नती आदेश देण्यात आले.

    सदर नियुक्ती प्रक्रियेसाठी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, सहायक आयुक्त संजय सरनाईक, कामगार अधिकारी राम काटकर व रवका अधिकारी प्रशांत पंडत यांनी आवश्यक पडताळणीची कार्यवाही पूर्ण केली.

 त्याचप्रमाणे महापालिकेच्या सेवेतून आज विविध विभागातील सेवानिवृत्त झालेल्या 29 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महापालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात सत्कार करण्यात आला. हा सत्कार स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, सभागृह नेता मुरलीधर जाधव, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, संघाचे मुख्य संघटक संजय भोसले, अध्यक्ष दिनकर आवळे यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र तसेच प्रा.फंड रक्कमेचा चेक प्रदान करण्यात आला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes