कोल्हापुरात प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्या सात व्यापाऱ्यांकडून 35 हजार रुपये दंड वसूल; व्यापाऱ्यांकडून 300 किलो प्लास्टिक जप्त
schedule22 Oct 24 person by visibility 346 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने शहरात एकल वापर प्लॅस्टिक बंदी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य निरिक्षक व कर्मचारी यांच्या पथकांमार्फत तपासणी मोहिम व कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीपुरी, बाजार गेट व छत्रपती शिवाजी चौक परिसरात एकल वापर प्लॅस्टिकची तपासणी केली. यावेळी लक्ष्मीपूरी येथील राम ट्रेडर्स, सनी प्लॅस्टिक, योगेश केसरकर, छत्रपती शिवाजी चौक येथील अंबिका स्वीट बेकर्स, बाजार गेट येथील मुनमुन शॉपी, समीर तांबोळे, सहारा कटलरी या व्यापाऱ्यांकडे तपासणी दरम्यान प्लॅस्टीकचा साठा आढळून आला. त्यामुळे आरोग्य विभागाच्या पथकाने या सात व्यापाऱ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये प्रमाणे 35 हजार रुपये दंड करुन तो वसूल करण्यात आला. त्याचबरोबर त्यांच्याकडुन 300 किलो प्लास्टिकही जप्त करण्यात आले.
ही कारवाई मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, विभागीय आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, ऋषिकेश सरनाईक, स्वप्निल उलपे, महेश भोसले, भूमी कदम, मुकादम व कर्मचारी यांनी केली.
🔲 व्यापा-यांना व नागरीकांना सिंगल युज प्लॅस्टिकचा वापर बंद करणेबाबत आवाहन
महानगरपालिकेच्या हद्दीमधील सर्व नमूद आस्थापना व संस्था यांनी एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर बंद करणेचा आहे. जर शहरामध्ये एकल वापर (सिंगल युज) प्लॅस्टिकचा वापर करताना आढळल्यास त्या आस्थापना, संस्था व नागरीकांवर आरोग्य विभागामार्फत दंडात्मक कांरवाई करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी सिंगल युज प्लॅस्टीकचा वापर टाळावा व कापडी पिशवीचा वापर करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.