SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डी वाय पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी सुरू केला स्टार्टअपश्री शाहू सह. दूध व्यव. संस्था मर्या. नागांवची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; उत्कृष्ट दूध उत्पादकांचा गौरव!कोल्हापुरात ४ ऑक्टोबरला 'खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा'; रोख बक्षीसांसह ४१ आकर्षक पारितोषिके जिंकण्याची सुवर्णसंधी!दुष्काळाच्या छायेत संवेदनशील निर्णय! भागीरथी संस्थेची 'झिम्मा फुगडी' स्पर्धा रद्द; बक्षिसाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देणार“स्वतःवर विश्वास ठेवा, मोठी स्वप्ने पाहा!” प्राध्यापक नितीन बानगुडे यांचा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेशशामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त गावोगावी मोफत आरोग्य शिबिरेजीवनगौरव पुरस्काराबद्दल कल्लाप्पाण्णा आवाडे (दादा) यांचा यड्रावकर कुटुंबाकडून सत्कारआंतरराष्ट्रीय अनुवाद दिन: संस्कृतींना जोडणारा भाषिक सेतूगेल्या ५ वर्षांच्या काटकसरी कारभारावर ठरावधारकांचा विश्वास : आमदार सतेज पाटीलगोकुळचे माजी संचालक सत्यजीत पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीरच्या राजकारणात नवा ट्विस्ट

जाहिरात

 

श्री शाहू सह. दूध व्यव. संस्था मर्या. नागांवची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; उत्कृष्ट दूध उत्पादकांचा गौरव!

schedule30 Sep 26 person by visibility 143 category

कोल्हापूर  : नागांव, (ता. करवीर) येथील श्री शाहू सहकारी दूध व्यवहारा संस्था मर्यादित, नागांव (ता. करवीर) या संस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या व उत्साही वातावरणात पार पडली

या सर्वसाधारण सभेत दूध उत्पादक स्पर्धा २०२५-२०२६ मधील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. ज्या सभासदांनी उत्कृष्ट दूध गुणवत्ता, उच्च संकलन आणि आदर्श गोठा व्यवस्थापन ठेवून यश संपादन केले, अशा जास्तीत जास्त गाय व म्हैस दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक सभासदांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.

 सभेमध्ये संस्थेचे चेअरमन बी. के. संकपाळ यांनी उपस्थित सभासदांना मोलाचे मार्गदर्शन केले. आभार  निवास तोरस्कर यांनी मानले. या महत्त्वपूर्ण सभेस संस्थेचे सर्व संचालक, सचिव, कर्मचारी व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

🟧 दूध उत्पादक स्पर्धा २०२५-२०२६ चे विजेते:
१. गाय दूध उत्पादन वर्ग:
 ▪️ प्रथम क्रमांक:  लता मारुती तेली
 ▪️ द्वितीय क्रमांक:  संगीता उत्तम मगदूम
 ▪️ तृतीय क्रमांक:  राजाराम दिनकर कोराणे

२. म्हैस दूध उत्पादन वर्ग:
 ▪️ प्रथम क्रमांक: विलास महादेव कोराणे
 ▪️ द्वितीय क्रमांक:  रावसो दादू पाटील
 ▪️ तृतीय क्रमांक:  शशिकांत चंदर कोराणे
उत्कृष्ट यश मिळवणाऱ्या सर्व विजेत्या दूध उत्पादक सभासदांचे शाहू दूध संस्था नागांवचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, सचिव, कर्मचारी व सर्व सभासदांच्या वतीने  अभिनंदन करण्यात आले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes