पुणे-बेंगळुरू महामार्गावर किणी येथे कंटेनरमधून बनावट विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या एका परप्रांतीयास अटक; एकूण 46,53,200 रु. किमतीचा मुद्देमाल जप्त
schedule02 Mar 23 person by visibility 1007 categoryगुन्हे
कोल्हापूर: पुणे-बेंगळुरू महामार्गावर किणी येथे छापा घालून अवैध मद्याची वाहतुक करणाऱ्या एक कंटेनर जप्त करून त्यातील बनावट विदेशी मद्यासह एकूण रू. 46,53,200/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत दिनेश जेकनराम कुमार (वय वर्ष 30, रा. कावोकी बेरी, रोहिला, ता. धोरीमन्ना गुडा मलानी, जि. बाडमेर राज्य राजस्थान) यास अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, कोल्हापूर विभागने ही कारवाई केली.
विभागीय उप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभाग कोल्हापूर डॉ. श्री. बी. एच. तडवी यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर या पथकाने दिनांक 02 फेब्रुवारी रोजी किणी गावच्या हद्दीत, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे छापा घालून अवैध मद्याची वाहतुक करीत असताना एक टाटा कंपनीचा कंटेनर यामध्ये कागदी पुठ्ठयाच्या बॉक्समध्ये बनावट विदेशी मद्य आईस मॅजिक ग्रीन अॅपल 750 मिलीच्या एकूण 3240 सिलबंद काचेच्या बाटल्या व 180 मिलीच्या एकूण 6240 सिलबंद काचेच्या बाटल्या असे एकूण 400 बॉक्स वाहतुक करीत असताना मिळून आले. एकूण मुद्देमाल रू. 46,53,200/- चा जप्त करण्यात आला असून आरोपीत दिनेश जेकनराम कुमार यास अटक करण्यात आली आहे.
( वाहन किमंत रू. 11,00,000/- मद्याची किमंत रू. 35,53,200/- असे एकूण मुद्देमाल किमंत रू. 46,53,200/- )
ही कारवाई निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर या पथकाने विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर डॉ. बी. एच. तडवी, यांचे आदेशाने एस. जे. डेरे निरीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली आर. जी. येवलुजे दुय्यम निरीक्षक, एस. एस. गोंदकर व कॉन्स्टेबल सर्वश्री सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, दिपक कापसे, योगेश शेलार यांनी केली.
पुढील तपास आर. जी. येवलुजे दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर हे करीत आहेत.