हरोली, धरणगुत्ती, नांदणी आणि जांभळी गावात ५३६ जणांना मोफत चष्म्यांचे वाटप; ५३ जणांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया
schedule22 Nov 26 person by visibility 70 categoryआरोग्य
शिरोळ : ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सहकारमहर्षी स्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुरू असलेल्या मोफत आरोग्य व नेत्र तपासणी अभियानांतर्गत चार गावांतील नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. धरणगुत्ती, हरोली, नांदणी आणि जांभळी या चार गावांतील एकूण ५३६ नागरिकांना मोफत चष्मे देण्यात आले. तसेच ५३ नागरिकांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन आणि शरद आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, यड्राव यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच आरोग्य व नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच गरजू रुग्णांना मोफत चष्मे आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ दिला जात आहे.
धरणगुत्ती येथे १८० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले असून २१ जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. हरोली येथे २०० नागरिकांना मोफत चष्मे देण्यात आले. नांदणी येथे ७२ नागरिकांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले असून १२ जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहे. तर जांभळी येथे १०४ नागरिकांना मोफत चष्मे देण्यात आले असून २० जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना दृष्टीदोषावर उपचार घेणे शक्य होत असून आर्थिक परिस्थितीमुळे उपचार टाळणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.
आरोग्य तपासणीपासून चष्मे वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रियेपर्यंतची सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्याने नागरिकांमधून या अभियानाचे कौतुक होत आहे.
धरणगुत्ती येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्या प्रचीता कोळी, संजय पाटील, बाबासो पाटील, शिवाजीराव शिंदे, संजय शंकर पाटील, अण्णासो पाटील, संजय दत्तात्रय पाटील, विस्तार अधिकारी चंद्रकांत केंबळे, विराज टोण्णे, राजू गवळी, राजू बाबा पाटील, प्रवीण तोडकर, दरिबा कांबळे, सचिन मोरे, साळवी, अनिल आवटी, संजीव गुरव, शिवाजी जाधव, महादेव कांबळे, रावसाहेब कांबळे, मिलिंद खांडेकर, संजय कोळी, संभाजी जाधव, संजय कोरे, अशगकर शेख, किरण कांबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
हरोली येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्या प्रतिता कोळी, नेमिनाथ चौगुले, सुनील पाटील, रामगोंडा पाटील, कांतिनाथ ऐनापुरे, भाऊसो पाटील, भाऊसो चौगुले, राजकुमार कांबळे, रोहित कांबळे, अण्णासो सुतार, संग्राम भोसले, रामदास सुतार, रुपेश कांबळे, विशांत कांबळे, प्रज्वल कांबळे, अमोल सुतार, मारुती साळुंखे, पांडुरंग कदम, प्रशांत चौगुले, कीर्तीकुमार पाटील, राजगोंडा पाटील, मनोज चौगुले, स्वप्निल पाटील, राजू परीट, अभिजीत ऐनापुरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
नांदणी येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्या प्रचीता कोळी, अजय पाटील यड्रावकर, संजय बोरगावे, रामगोंडा पाटील, सागर शंभूशेटे, प्रकाश लठ्ठे, बाबासाहेब बागडी, राजेंद्र नरदे, पी. एल. आंबी, इब्राहिम मोमीन, आनंद हजारे, पोपट बोरगावे यांच्या सह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जांभळी येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्या प्रचीता कोळी, पंचायत समिती सदस्य बंटी पाटील टाकवडेकर, कुलदीप पाटील, पिंटू पाटील, बापू गोविलकर, प्रमोद पाटील, संतोष उगळे, प्रशांत कांबळे, दिलीप पाटील, बाबगोंडा पाटील, किरण मोरे, दत्तात्रय कदम यांच्यासह गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.