SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राज्यात गणेशोत्सव होणार आता राज्य महोत्सव : सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलारसांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव होणार ईश्वरपूरहिंदू जन संघर्ष समितीच्या उपोषणाची ११ व्या दिवशी भिडे गुरुजींच्या उपस्थितीत सांगता दूरशिक्षण, ऑनलाईन शिक्षण आजची गरज: डॉ. विलास शिंदे पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा शाश्वत विकास साधण्यासाठी प्रयत्न करुया : जिल्हाधिकारी अमोल येडगेकितीही स्थित्यंतरे आली तरी चित्रपटाचे ‘स्टोरीटेलिंग’ कायमच: डॉ. जब्बार पटेलदुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना रेनकोट, शैक्षणिक साहित्य वाटपभुदरगड तहसिल कार्यालयात सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजनराज्यस्तरीय उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेसाठी 20 ऑगस्ट पर्यंत अर्ज कराउखळु धबधबा पर्यटकांसाठी पर्वणी; हिरवागर्द निसर्गसौंदर्याची पर्यटकांना साद...

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यातील 75 बंधारे पाण्याखाली; वाहतुकीस पर्यायी मार्गाचा अवलंब; राधानगरी धरणातून 1450 क्युसेक विसर्ग

schedule20 Jul 24 person by visibility 650 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 6.08 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1450 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व रुकडी, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी, न्हावेली, उमगाव, कोकरे व कोवाड वेदगंगा नदीवरील- म्हसवे, शेणगाव, गारगोटी, निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली व करडवाडी हिरण्यकेशी नदीवरील - साळगांव, विलजी, ऐनापूर व गिजवणे, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिध्दनेर्ली, सुळकूड व बाचणी कडवी नदीवरील- भोसलेवाडी, कोपार्डे, शिरगाव, सवते सावर्डे व सरुड पाटणे, वारणा नदीवरील -चिंचोली, तांदूळवाडी, कोडोली, माणगाव, खोची व शिगाव भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, शिरगाव व तारळे कुंभी नदीवरील- कळे, शेनवडे, मांडुकली व वेतवडे कासारी नदीवरील- येवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, कांटे, वालोली, बाजार भोगाव,पेंडाखळे, करंजफेण, कुंभेवाडी, सुसकेवाडी, नवलाचीवाडी-1 व नवलाचीवाडी-2 धामीण नदीवरील- सुळे, पनोरे व आंबर्डे घटप्रभा नदीवरील- हिंडगाव, कानडे-सावर्डे, आडकुर, तारेवाडी, कानडेवाडी, बिजूर भोगोली व पिळणी, तुळशी नदीवरील – बीड असे एकूण 75 बंधारे पाण्याखाली आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 6.08 टीएमसी, तुळशी 2.25 टीएमसी, वारणा 23.54 टीएमसी, दूधगंगा 13.95 टीएमसी, कासारी 1.96 टीएमसी, कडवी 2.23 टीएमसी, कुंभी 1.63 टीएमसी, पाटगाव 3.06 टीएमसी, चिकोत्रा 0.77 टीएमसी, चित्री 1.59 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.18 टीएमसी, सर्फनाला 0.46 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 35.5 फूट, सुर्वे 33.6 फूट, रुई 63 फूट, इचलकरंजी 58.3 फूट, तेरवाड 52 फूट, शिरोळ 42.6 फूट, नृसिंहवाडी 41 फूट, राजापूर 30.1 फूट तर नजीकच्या सांगली 14.9 फूट व अंकली 18.11 फूट अशी आहे.

🔴 जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण 29.9 मिमी पाऊस; पन्हाळा येथे 57.4 मिमी पाऊस
कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण 29.9 मिमी पाऊस झाला असून काल दिवसभरात पन्हाळा तालुक्यात सर्वाधिक 57.4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 14 मिमी, शिरोळ -3.4 मिमी, पन्हाळा- 57.4 मिमी, शाहुवाडी- 55.7 मिमी, राधानगरी- 21.7 मिमी, गगनबावडा- 46.2 मिमी, करवीर- 26.8 मिमी, कागल- 13.8 मिमी, गडहिंग्लज- 17.2 मिमी, भुदरगड- 44.8 मिमी, आजरा- 35.2 मिमी, चंदगड- 50 मिमी असा एकूण 29.9 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes