SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पर्यटन संचालनालयातर्फे सात दिवसीय नमो पर्यटन कौशल्य प्रशिक्षण योजना‘अमृतपेठ – थेट बाजारपेठ’ प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची सदिच्छा भेटस्लिपर कोच बसची 31 मार्चपर्यंत तपासणी करण्याचे आवाहनपर्यटकांची गैरसोय टाळा; गॅस टंचाईवरून कोल्हापुरात सकल हिंदू समाज आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनचंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचे बुधवारपासून आयोजन : परिवहन सभापती सत्यजित जाधव, राजेंद्र कुरणे यांची माहितीडॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी येथे यशस्वी कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हपुरोगामी विचारांचे दीपस्तंभ: बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाडसेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकअजितदादा पवार यांच्या स्मारकासाठीच्या संभाव्य जागांची महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्याकडून पाहणीमुंबई शहरातील वाढत्या अतिक्रमणांच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना राबवा : पालकमंत्री ॲड.आशिष शेलार

जाहिरात

 

स्लिपर कोच बसची 31 मार्चपर्यंत तपासणी करण्याचे आवाहन

schedule17 Mar 26 person by visibility 87 categoryराज्य

कोल्हापूर : राज्यातील महामार्गांवर धावणाऱ्या खासगी स्लिपर कोच बसना वारंवार लागणाऱ्या आगीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर परिवहन आयुक्त कार्यालयाने राज्यातील सर्व स्लिपर कोच बसची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

2 जानेवारी रोजी पहाटे 3 वाजता समृद्धी महामार्गावर मुंबईहून बुलढाण्याकडे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसला आग लागून बस पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. बसमधील 32 प्रवाशांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला होता. यापूर्वी जुलै 2023 मध्ये सिंदखेडराजा येथे 25 प्रवाशांचा, ऑक्टोबर 2023 मध्ये 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या तसेच मेहेकरजवळील शिवणी पिसा परिसरात 36 प्रवाशांचे जीव थोडक्यात वाचल्याच्या घटना घडल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानमंडळात लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली होती. त्यानुसार परिवहन आयुक्त कार्यालयाने सर्व स्लिपर कोच बसची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तपासणीदरम्यान मोटार वाहन अधिनियम 1988 तसेच त्याअंतर्गत असलेले नियम, तसेच AIS-119 व AIS-052 या मानकांनुसार बसची रचना तपासली जाणार आहे. यामध्ये अनधिकृत संरचनात्मक बदल किंवा मानकांशी विसंगती आढळल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर येथे नोंदणी असलेल्या सर्व स्लिपर कोच बस वाहनमालकांनी आपल्या वाहनांची तपासणी 31 मार्च 2026 पर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालयात करून घ्यावी, असे आवाहन सहा प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांनी केले आहे. ही तपासणी पूर्णपणे निशुल्क असल्याचेही त्यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes