कोल्हापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील 92 डिजीटल बोर्ड हटविले
schedule12 Dec 25 person by visibility 78 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील तरतुदी नुसार व मालमत्तेच्या विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम 1995 नुसार शहरातील अनाधिकृत व बेकायदेशरी लावण्यात आलेल्या डिजीटल बोर्डवर महापालिकेच्यावतीने कारवाई सुरु आहे.
या अंतर्गत आज विभागीय कार्यालय क्र.1 ते 4 व अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत संभाजीनगर ते निर्माण चौक, उमा टॉकीज चौक ते यल्लमा मंदीर चौक, महालक्ष्मी चौक, धैर्यप्रसाद चौक ते लाईनबझार, शुगरमिल ते खानविलकर पेट्रोल पंप, सुभाषनगर चौक ते प्रतिभानगर ते राजारामपुरी मेन रोड जनता बझार चौक येथील मुख्य रस्त्यावरील 92 अनाधिकृत डिजीटल बोर्डवर कारवाई करुन ते जप्त करण्यात आले.
ही कारवाई प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे व शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या नियंत्रणाखाली अतिक्रमण अधिक्षक विलास साळोखे, सहा.अधिक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत व विभागीय कार्यालयाकडील कर्मचाऱ्यां मार्फत करण्यात आली.