SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गणेशभक्तीच्या गजरात सामाजिक एकात्मतेचा संदेश; बाबू जमाल तालमीच्या वतीने भव्य अथर्वशीर्ष पठणजागतिक गेंडा दिन: संरक्षण आणि संवर्धनाची निकडबालकांनी सोशल मीडियाचा वापर टाळावा : सहायक पोलीस निरीक्षक स्वाती यादवज्युनिअर एशियन हॉकी विजेत्या सानिका माने हिचा सत्कारवन हक्क दावे तातडीने निकाली काढा : पालकमंत्री प्रकाश आबिटकर गोकुळ निवडणुकीत महायुती म्हणूनच लढणार; ८ ऑक्टोबरला माघारीच्या दिवशी पॅनेल जाहीर होणार : मंत्री हसन मुश्रीफमानवतेचे सोने! हरवलेले सोन्याचे गंठण प्रामाणिकपणे परत करणाऱ्या कोल्हापूरच्या सफाई दूतांचा आश्किन आजरेकर यांच्या हस्ते गौरवडॉ. डी. वाय. पाटील कृषी संकुलच्या मुलींचा संघ पाचव्यांदा विजेताभविष्यातील तंत्रज्ञान सहकार्यासाठी केआयटी यु.डब्ल्यू.ए.चा ‘मेजर स्ट्रॅटेजिक पार्टनर’: डॉ.चकमासंगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह १ ऑक्टोबरपासून सुरू करा : आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड

जाहिरात

 

गणेशभक्तीच्या गजरात सामाजिक एकात्मतेचा संदेश; बाबू जमाल तालमीच्या वतीने भव्य अथर्वशीर्ष पठण

schedule22 Sep 26 person by visibility 77 categoryसामाजिक

कोल्हापूर : शतकोत्तरी परंपरा लाभलेल्या बाबू जमाल तालमीच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त गणरायासमोर सामुदायिक अथर्वशीर्ष पठण आणि भक्तिमय आरतीचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक उपक्रमाला परिसरातील ४०० हून अधिक महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत गणरायाच्या चरणी सामूहिक भक्तिभाव अर्पण केला.


गणेशोपासनेमध्ये अथर्वशीर्ष पठणाला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. श्रीगणेश हे बुद्धी, विवेक, मंगलकार्य आणि विघ्नहर्तृत्वाचे प्रतीक मानले जाते. सामूहिक स्वरात अथर्वशीर्ष पठण झाल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. मंत्रोच्चार, आरतीचा जयघोष आणि गणरायाच्या नामस्मरणामुळे आध्यात्मिक चैतन्य निर्माण झाले.
या उपक्रमात स्थानिक भाजपा नगरसेविका दीपा अजित ठाणेकर, विश्व हिंदू परिषद-मातृशक्तीच्या अश्विनी ढेरे, सांगलीच्या सामाजिक कार्यकर्त्या कालावती पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांनी सहभाग घेतला. सहभागी मान्यवर महिलांचा बाबू जमाल तालमीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.


गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारा, परस्पर स्नेह आणि सामाजिक बांधिलकी दृढ करणारा उत्सव ठरावा, या भावनेतून तालमीच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. सामुदायिक पठणाच्या माध्यमातून महिलांचा सहभाग वाढविण्यासोबतच संस्कार, अध्यात्म आणि सामाजिक एकोपा यांचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बाबू जमाल तालमीचे अध्यक्ष अमित चव्हाण, उपाध्यक्ष मानसिंग शिंदे, सचिव अभय नाचलकर यांच्यासह संचालक अरुण आत्ता, शकील जमादार, विपचे सुधीर जोशी, वंदुरकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी माजी नगरसेवक अजित ठाणेकर, अनिरुद्ध कोल्हापुरे, आरोग्य मित्र राजेंद्र मकोटे, सामुदायिक अथर्वशीर्ष पठण करणारे गुळवणी काका व त्यांचा पुजारी वर्ग, तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला गुरुवार, २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून बाबू जमाल तालमीच्या वतीने गणेशभक्तांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes