कोल्हापुरातील शिये येथे दहा वर्षीय मुलीचा लैंगिक अत्त्याचार करून खून
schedule22 Aug 24 person by visibility 897 categoryगुन्हे
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील शिये गावात एका दहा वर्षीय मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला आहे. लैंगिक अत्त्याचार करून हा खून केल्याचा संशय व्यक्त होत आहे . या घटनेने एकच खळबळ उडाली.
बदलापुरातील दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवरुन राज्यात संतापाची लाट उसळली असून राज्यात या घटनेचा तीव्र निषेध होत आहे या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी महाराष्ट्र बंदची हाक ही देण्यात आली आहे.
अशा ढवळलेल्या वातावरणामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी आणखी घटना कोल्हापूरमध्ये समोर आली आहे .करवीर तालुक्यातील शिये गावात दहा वर्षीय बालिके वर लगिक अत्याचार करून तिचा गळा दाबून, बुक्क्यांनी शिवानी अग्रहरी मारहाण करून खून करणाऱ्या दिनेश कुमार केसनाथ साह (वय २५ रा. बिहार) याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आठ तासात या गुन्ह्याची उकल केली. संशयित हा पीडित बालिकेच्या आईच्या वाहिनीचा भाऊ आहे. गेल्या तीन महिन्यापासून त्यांच्या घरी राहत होता.
या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली आहे. करवीर पोलीस उपधिक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांच्यासह दोन महिला पोलीस उपनिरीक्षक, मानवी तस्करी विरोधी शाखेतील कर्मचारी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचारी यांचा समावेश करण्यात आला आहे.
घटनास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तातडीने धाव घेतली व तपास कामात योग्य मार्गदर्शन केले. घटनास्थळी करवीर विभागीय पोलीस अधीक्षक सुजीत क्षिरसागर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह पोलीस फाटा हजर होता. शवविच्छेदन व फॉरेन्सीकचा अहवाल मिळाल्यानंतर तपासाला गती येईल.मात्र राज्यांमध्ये मुलीवरील अत्याचाराच्या घटना वाढत असून राज्यांमध्ये महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.