डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे ''राष्ट्रीय डॉक्टर डे' उत्साहात; कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्याकडून शुभेच्छा
schedule01 Jul 25 person by visibility 186 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्यावतीने मंगळवारी 'राष्ट्रीय डॉक्टर डे' उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉक्टरांच्या सेवेबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र नेरली, उपअधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालप्पा, डॉ. शिंपा शर्मा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, डॉ. बी सी पाटील, संजय जाधव, अजित पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. विधानचंद्र राय यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर्स व पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांच्या कार्याच्या समानार्थ ' राष्ट्रीय डॉक्टर डे' साजरा केला जातो. '''केअरिंग फोर केअर गिव्हर्स' या थीमवर पृथ्वीराज पीजी क्लबच्या वतीने डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते केक कापून सर्व डॉक्टर व सहकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी डॉ. पाटील म्हणाले, “डॉक्टर हे समाजाच्या आरोग्यचे शिल्पकार असतात. त्यांच्या सेवेबाबत सर्वजण कृतज्ञ आहोत.”
कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा म्हणाले, “ डॉक्टरांवर प्रचंड ताण असतो. मात्र त्याची योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. डॉक्टर हा माणूसच आहे हे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनीही लक्षात घेणे गरजेचे आहे. रुग्णांना सर्वप्रथम सामोरे जाणारा पॅरा_ मेडिकल स्टाफ अत्यंत महत्त्वाचा असून त्यांच्या बाबतही कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे.
अधिष्ठाता डॉ. राजेंद्र नेरली म्हणाले, “आजचा दिवस हा डॉक्टरांच्या कार्याचा आदर करणारा आहे. डॉक्टरांकडून अपेक्षा वाढल्याने बऱ्याचदा उपचारा वेळी ताणतणावांना समोर जावे लागते. पण याबाबतची योग्य व्यवस्थापन करून चांगली सेवा देण्याचे प्रयत्न करावा ”
डॉक्टरांच्या सेवाभावाचे कौतुक करणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी यावेळी सादर केले. यामध्ये स्कीट, नृत्य, वादन अधिक माध्यमातून डॉक्टरांच्या सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमास हॉस्पिटलमधील सर्व विभागांचे अधिकारी, डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी डॉक्टरांच्या निःस्वार्थ सेवेबद्दल आभार व्यक्त केले.