अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात, चौघे जखमी
schedule22 Nov 25 person by visibility 8 categoryगुन्हे
बीड : उपमुख्यमंत्री अजित पवार धारूरवरून केजकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातील गाडीची धूनकवड फाटा परिसरात दुचाकीला धडक बसल्याने नवरा-बायको आणि दोन लहान मुलांसह चौघे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्परतेने मदत करत जखमींना धारूर ग्रामीण रुग्णालयात हलवले. घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
या धडकेत ताफ्यातील सुरक्षा रक्षकही जखमी झाला . त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
पोलिसांनी रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करून पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजले नाही.