ज्येष्ठ संशोधक काशीनाथ देवधर यांचे मंगळवारी विद्यापीठात विशेष व्याख्यान
schedule21 Nov 25 person by visibility 26 categoryराज्य
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी व स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने “मिट द सायंटिस्ट” या उपक्रमांतर्गत भारत सरकारच्या पुणे येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) ज्येष्ठ संशोधक तथा निवृत्त समूह संचालक काशीनाथ देवधर यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
येत्या मंगळवारी (दि. २५) दुपारी २ वाजता “ऑपरेशन सिंदूर आणि आत्मनिर्भर भारत” या विषयावर विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात हे व्याख्यान होईल. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थी-केंद्री संशोधन प्रकल्पांना चालना मिळावी हा या व्याख्यानामागील उद्देश असल्याचे कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. पी. जे. पाटील (स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी) आणि प्रा. डॉ. ए. बी. कोळेकर (स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी) यांनी सांगितले. डॉ. डी. एन. कुऱ्हे (डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी) व डॉ. एच. सी. पंडित (स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी) सहसमन्वयक आहेत. या व्याख्यानाचा विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.