SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य सप्ताहाचे आयोजनकोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली राधानगरी धरणात 8.36 टीएमसी पाणीसाठापावनखिंडच्या पाऊलखुणांवर ५०० हून अधिक शिवभक्तांची प्रेरणादायी पदभ्रमंतीज्येष्ठ नागरिकांच्या तीर्थदर्शनाचे स्वप्न पूर्ण: नागपूरहून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रे’चा शुभारंभमहिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती: राज्यपाल जिष्णु देव वर्माकोल्हापूर पोलिसांचा गुन्हेगारांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’! रेकॉर्डवरील १६० सराईतांची उचलबांगडीलोकसंख्या नियंत्रणाचा संदेश: कसबा बावड्यात विद्यार्थ्यांचे पथनाट्य; नागरिकांमध्ये जनजागृतीविवाहात आहेर नको, थेट अंधशाळेला मदत! वाझे परिवाराचा कोल्हापुरात कौतुकास्पद उपक्रमशाश्वत जीवनशैलीचा स्वीकार हाच हवामान बदलावर प्रभावी उपाय’ : प्रा. चेतनसिंह सोलंकीशेंडा पार्क येथे सुरू असलेल्या विविध बांधकामाचे IIT मार्फत थर्ड पार्टी ऑडिट करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

जाहिरात

 

'हीच खरी शिवसेना', कोल्हापुरातील सभेतून अमित शाहांचे मोठे विधान

schedule20 Jun 26 person by visibility 375 categoryराजकीय

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्यांतर्गत श्री महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग व परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते शनिवारी, २० जून रोजी सकाळी पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूर येथील पोलीस ग्राऊंड, लाईन बझार येथे एका भव्य कृतज्ञता सोहळ्याचे आणि जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेत उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाबद्दल महत्त्वपूर्ण भाष्य केले.

आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की, "पूर्वी शिंदेजींच्या मागे शिवसेना 'शिंदे गट' असे म्हणावे लागत असे. मात्र, आता कोणताही गट उरलेला नाही, हीच खरी शिवसेना आहे". या विधानातून त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिकृत मान्यता असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes