SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
लक्ष्मी वकिलांच्या झोळीत, शेतकरी-बहिणी मात्र वाऱ्यावर? सतेज पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल!समता, नामस्मरण आणि सेवेचा प्रकाश : गुरु नानक जयंतीकोल्हापूर जिल्ह्यात सलग १७ तास रिक्षा बंद; प्रवाशांची गैरसोय, विविध ठिकाणी निदर्शनेखेबवड्यातील वर्षानुवर्षे बंद असलेला हातपंप पुन्हा सुरू; सागर भोगम यांच्या पाठपुराव्याला यशयुवाशक्ती फाऊंडेशनच्या भव्य नोकरी मेळाव्यात ५०० युवकांना रोजगाराची सुवर्णसंधी; सागर भोगम यांच्याकडून आयोजकांचे कौतुकसहकाररत्न शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांना मान्यवरांकडून अभिवादनकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हशींसह गाय खरेदीसाठीही देणार कर्ज कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हशींसह गाय खरेदीसाठीही देणार कर्ज मुख्यमंत्री ग्राम सडक व हॅम योजनेअंतर्गत सुरू असलेली रस्त्यांची कामे जानेवारी अखेर पूर्ण करा : मंत्री हसन मुश्रीफआयटीआयमधून प्रशिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांनी कोल्हापुरात उद्यमनगरीचा पाया रचणार्‍या म्हादबा मिस्त्री यांचा आदर्श ठेवावा, खासदार धनंजय महाडिक यांचं आवाहन

जाहिरात

 

लक्ष्मी वकिलांच्या झोळीत, शेतकरी-बहिणी मात्र वाऱ्यावर? सतेज पाटलांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल!

schedule24 Nov 26 person by visibility 6 categoryराजकीय

कोल्हापूर : गोकुळमध्ये समविचारी आघाडीचे बहुमत मोडून काढण्यासाठी कायद्यात बदल केला आणि आता तो टिकवण्यासाठी तब्बल ८० लाख रुपये वकिलांवर उधळले जात आहेत, असा घणाघात आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला.

दुष्काळ, रखडलेली मदत, बेरोजगारी आणि लाडक्या बहिणींची अवस्था बिकट असताना, सत्ताधाऱ्यांची ही उधळपट्टी कशासाठी, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. सीमा प्रश्न, आरक्षणाचे विषय, टीईटी किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न बाजूला ठेवून केवळ सत्ता टिकवण्यासाठी वकिलांची फौज उभी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 'डेडलॉक'चा मुद्दा दिशाभूल करणारा असून, प्रशासकाचा नियम फक्त गोकुळसाठीच का, असा थेट सवालही त्यांनी विचारला.

भुदरगडमध्ये पहाटे पोलिसांच्या बंदोबस्तात शक्तिपीठ महामार्गाची मोजणी करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी हाणून पाडला. यावर बोलताना, सरकार कॉन्ट्रॅक्टरांच्या हितासाठी धडपडत असून शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात जाणारे प्रकल्प रेटल्यास जनतेसह खंबीरपणे उभे राहू, असा इशारा पाटील यांनी दिला. कोयनेच्या आणि कृष्णा लवादाच्या पाण्यावर गदा येऊ देणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.

लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधाऱ्यांना फटकारताना, मतदानासाठी हात धरला आणि नंतर सोडला, याचा हिशेब जनता करेल, असे ते म्हणाले. तसेच आमदार फुटीच्या रंगणाऱ्या चर्चांवर भाष्य करताना, या घडामोडींवर आंतरराष्ट्रीय पातळीवर एखादी 'फिक्शन नॉवेल' लिहावी लागेल, असा टोला त्यांनी मारला. जिल्ह्यातील प्रश्न, महामार्ग आणि घोटाळ्यांबाबत पालकमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करत महापालिकेतील चांगल्या कामांना साथ आणि चुकीच्या गोष्टींना विरोध राहील, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes