कोरे अभियांत्रिकीचे प्रा. अनिकेत तोडकर यांना पी.एच.डी. पदवी प्रदान
schedule13 Feb 26 person by visibility 78 categoryराज्य
वारणानगर : वारणा विद्यापीठ अंतर्गत अग्रणी संस्था तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त) महाविद्यालयातील अप्लाईड सायन्सेस अँड ह्युमॅनिटीज विभागातील प्राध्यापक अनिकेत सर्जेराव तोडकर यांना सरदार वल्लभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सुरत कडून मॅथेमॅटिक्स या विषयात पी.एच.डी. पदवी प्रदान झाली आहे.
त्यांनी "सम वेरीएंट्स ऑफ मल्टी ऑब्जेक्टिव्ह शॉर्टेस्ट पाथ प्रॉब्लेम्स अंडर अनसर्टन एन्व्हायरमेंट विथ एक्स्पिरेशन लेव्हल बेस्ड एनएसजीए टू अँड थ्री" या विषयावर संशोधनपर प्रबंध सादर केला. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील जर्नल मध्ये शोधनिबंध प्रकाशित केलेले आहेत.
संशोधनासाठी डॉ. जयेश दोडिया, सरदार वल्लभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सुरत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी, एन . एच. पाटील, कुलगुरू, डॉ. डी. टी. शिर्के व श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
आपल्या संशोधनाचा उपयोग समाजाच्या आणि विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी करावा असा सल्ला डॉ. विनय कोरे यांनी दिला. अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, प्राचार्य डॉ. डी. एन. माने व विभागप्रमुख डॉ. पी. जे. पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.