प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांची कोल्हापूर महापालिकेला अभ्यास भेट
schedule13 Feb 26 person by visibility 147 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. अधिकारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेस अभ्यास भेट दिली. या प्रशिक्षणार्थी पथकात १० आय.ए.एस. अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
सकाळी महापालिकेच्या आयुक्त कार्यालयात भेट देऊन अधिकाऱ्यांनी आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांची भेट घेतली व महापालिकेच्या विविध विभागांच्या कामकाजाची सविस्तर माहिती जाणून घेतली. आयुक्त कार्यालयातील मिटिंग हॉलमध्ये आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी सर्व प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यावरील पुस्तक देऊन स्वागत केले. या १० आय.ए.एस. अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्र अप्सरा एन., मध्यप्रदेश शिल्पा चौहान, पुष्पराज, उत्तर प्रदेश अदित्य विक्रम अग्रवाल, आसामचे कार्तिकेय कुमार, आंध्रप्रदेश श्रवण रेड्डी, गुजरात त्रिलोक सिंग, हिमाचल प्रदेश विशाल लास, पंजाब अडिबा शेख अशा विविध ठिकाणच्या केडरच्या अधिका-यांचा समावेश आहे.
यावेळी आयुक्तांनी महानगरपालिकेच्या प्रशासकीय रचनेबरोबरच सुरू असलेल्या विकासकामांची माहिती या प्रशिक्षणार्थींना दिली. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची स्लाईड शोद्वारे माहिती दिली. यानंतर प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी रंकाळा तलाव, छत्रपती शाहू समाधी स्थळ तसेच उद्यान परिसराला भेट देऊन महापालिकेमार्फत करण्यात आलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
या प्रसंगी उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे, कामगार अधिकारी राम काटकर व सिस्टीम मॅनेजर यशपाल रजपूत उपस्थित होते.