SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बदलत्या तंत्रज्ञान युगातही पॅथॉलॉजिस्टचे महत्त्व कायम : डॉ. उमेश कानडे​शासकीय वसतिगृह व इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी 10 ऑक्टोबर पर्यंत ऑफलाईन अर्ज भरण्याचे आवाहनतोरणहळ्ळीच्या हनुमान चरणी मंत्री हसन मुश्रीफ लीन; बांधली पूजाभाजपची महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा; पुणे व नागपूर मतदारसंघांसाठी नावे निश्चितभुदरगडमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून पर्यावरण संवर्धनाला बळजागतिक पशु दिवस: मुक्या जीवांच्या संरक्षणाचा संकल्पमहिलांच्या ‘मार्केटिंग व विक्री कौशल्या’साठी विद्यापीठात सोमवारी एकदिवसीय कार्यशाळारेल्वे रिझर्वेशन सेंटरचे आमदार अमल महाडीक यांच्या हस्ते उद्घाटनजिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी पन्हाळा तालुक्यातील विविध पिकांची केली पाहणीमाजी दुग्धविकास मंत्र्यांचा दावा गंभीर, 'गोकुळ' वाचवण्यासाठी समविचारी आघाडीला साथ द्या: आमदार सतेज पाटील

जाहिरात

 

​शासकीय वसतिगृह व इतर शिष्यवृत्ती योजनांसाठी 10 ऑक्टोबर पर्यंत ऑफलाईन अर्ज भरण्याचे आवाहन

schedule04 Oct 26 person by visibility 74 categoryसामाजिक

कोल्हापूर : इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह योजना, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना व पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयं योजनेअंतर्गत प्रवेशासाठी  10 ऑक्टोबर 2026 पर्यंत मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे.

​सन २०२६-२७ या वर्षातील १२ वी नंतरच्या व्यावसायिक व अव्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी https://hmasnew.mahait.org/](https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या योजनेअंतर्गत महानगरापालिका क्षेत्रातील महाविद्यालयांच्या पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक रु. ४३ हजार (महानगरपालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृह योजनेस अर्ज करणे अनिवार्य आहे) व तालुका क्षेत्रातील महाविद्यालयांच्या पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक रु. ३८ हजार इतका लाभ दिला जातो.  

​कोल्हापूर जिल्ह्यातील महाविद्यालयांत व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाईन अर्ज भरता आला नव्हता. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना दिनांक १० ऑक्टोबर २०२६ अखेर ऑफलाईन अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे.  

​पात्र विद्यार्थ्यांनी आपले ऑफलाईन अर्ज 'सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, विचारे माळ, तिसरा मजला, कोल्हापूर' या कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन सहायक संचालक सुनीता नेर्लीकर यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes