SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
तोरणहळ्ळीच्या हनुमान चरणी मंत्री हसन मुश्रीफ लीन; बांधली पूजाभाजपची महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा; पुणे व नागपूर मतदारसंघांसाठी नावे निश्चितभुदरगडमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून पर्यावरण संवर्धनाला बळजागतिक पशु दिवस: मुक्या जीवांच्या संरक्षणाचा संकल्पमहिलांच्या ‘मार्केटिंग व विक्री कौशल्या’साठी विद्यापीठात सोमवारी एकदिवसीय कार्यशाळारेल्वे रिझर्वेशन सेंटरचे आमदार अमल महाडीक यांच्या हस्ते उद्घाटनजिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी पन्हाळा तालुक्यातील विविध पिकांची केली पाहणीमाजी दुग्धविकास मंत्र्यांचा दावा गंभीर, 'गोकुळ' वाचवण्यासाठी समविचारी आघाडीला साथ द्या: आमदार सतेज पाटील‘वंचित घटकांचे सिनेमातील स्थान’वर शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय कार्यशाळा ६ व ७ ऑक्टोबरला आयोजन; कार्यशाळा सर्वांसाठी खुलीस्व. शामरावअण्णा पाटील यड्रावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त उमळवाड येथे आरोग्य शिबिर; ४५० नागरिकांची आरोग्य व नेत्र तपासणी

जाहिरात

 

भुदरगडमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवातून पर्यावरण संवर्धनाला बळ

schedule04 Oct 26 person by visibility 72 categoryसामाजिक

◼️20 हजार 630 गणेशमूर्तींचे संकलन;
 ◼️6.3 टन निर्माल्याचे स्वतंत्र व्यवस्थापन
◼️33 टन प्लास्टर ऑफ पॅरिस जलस्रोतांत जाण्यापासून रोखले

कोल्हापूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत पंचायत समिती भुदरगड व जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या पुढाकारातून यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आला. गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून गणेशमूर्ती संकलन, पर्यावरणपूरक विसर्जन, निर्माल्य संकलन व त्यावर प्रक्रिया यामुळे पर्यावरण संवर्धनाला चालना मिळाली.
भुदरगड तालुक्यात यंदा 20 हजार 630 गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले. यामध्ये 20 हजार 288 घरगुती आणि 342 सार्वजनिक गणेशमूर्तींचा समावेश आहे. गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात आली.

गणेशोत्सवादरम्यान सुमारे 6.3 टन निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करण्यात आले. त्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करून सेंद्रिय खत निर्मितीसाठी त्याचा वापर करण्यात आला. यामुळे सुमारे 2.52 ते 3.15 टन सेंद्रिय खत निर्मिती होण्याची शक्यता आहे.

संकलित गणेशमूर्तींच्या आधारे सुमारे 33 टन प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) जलस्रोतांमध्ये जाण्यापासून रोखण्यात आल्याचा अंदाज आहे. त्यामुळे नदी, तलाव, विहिरी व ओढ्यांमधील जलप्रदूषण कमी करण्यास मदत झाली.

या उपक्रमात पंचायत समिती, ग्रामपंचायती, ग्रामसेवक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, स्वयंसेवक तसेच नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. श्रद्धेसोबत पर्यावरण संवर्धनाची सांगड घालणारा हा उपक्रम भुदरगड तालुक्यात प्रभावीपणे राबविण्यात आला, अशी माहिती गटविकास अधिकारी डॉ. शेखर जाधव यांनी दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes