कोल्हापूर जिल्ह्यातील दोन शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख नामकरणास मान्यता
schedule17 Jan 25 person by visibility 177 categoryआरोग्य
🔹 मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने शासन निर्णय जाहीर
कोल्हापूर : कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील 132 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण यशस्वीपणे करण्यात आले आहे. यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिरोळ, जि. कोल्हापूर या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे खाशाबा जाधव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिरोळ, जि. कोल्हापूर व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुर्केवाडी, जि. कोल्हापूरचे स्वरगंधर्व सुधीर फडके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुर्केवाडी, जि. कोल्हापूर असे नामकरण करण्यात आले आहे.
प्रथम 14 शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील फक्त 2 औद्योगिक संस्था सोडल्या तर इतर औद्योगिक संस्थांना या आधी कोणत्याही प्रकारची नावे नव्हती.
त्यांनतर कौशल्य विकास विभागाद्वारे महाराष्ट्रातील शासकीय औद्योगिक संस्थांसाठी नागरिकांकडून नावाबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे राज्यातील 132 आयटीआयचे नामकरण करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 2 शासकीय औद्योगिक संस्थांना नवीन ओळख मिळाली.