दसरा महोत्सव बुद्धिबळ स्पर्धेत अर्जुन चौगुले, ध्रुव गोयल, सिया परांजपे, शारंग भोईटे, जय पाटील, हर्ष कांबळे, विवान परांजपे, राजवर्धन मोरे विजेते
schedule19 Oct 26 person by visibility 149 categoryक्रीडा
कोल्हापूर : विद्यापीठ हायस्कूल व डी डी शिंदे (सरकार) स्पोर्ट्स यांचे वतीने, अनुज चेस अकॅडमी व इचलकरंजी चेस अकॅडमी यांचे सहकार्याने दि 18 ऑक्टोबर रोजी विद्यापीठ हायस्कूल महालक्ष्मी मंदीर कोल्हाहपूर येथे बुद्धिबळ स्पर्धा घेण्यात आल्या.
स्पर्धेमध्ये एकूण 8 गटात घेण्यात आल्या.
राजवर्धन मोरे ने सानवी खोत वर विजय मिळवत पहिलीच्या गटात प्रथम क्रमांक मिळवला. विवान परांजपे ने श्रीहर्ष होनकट्टीवर विजय मिळवत दुसरीच्या गटात प्रथम क्रमांक मिळवला. हर्ष कांबळे ने शिवेंद्र पवार वर विजय मिळवत तिसरीच्या गटात प्रथम क्रमांक मिळवला. जय पाटील अमेय यादव वर विजय मिळवत चौथीच्या गटात प्रथम क्रमांक. सारंग भोईटेने हर्ष मडनाईक वर विजय मिळवत पाचवीच्या गटात प्रथम क्रमांक मिळवला. सिया परांजपे ने अथर्व करवेकर वर विजय मिळवत सहावीच्या गटात प्रथम क्रमांक मिळवला. ध्रुव गोयल ने श्रेयश माळी वर विजय मिळवत सातवीच्या गटात प्रथम क्रमांक मिळवला. अर्जुन चौगुले ने आरुष माने वर विजय मिळवत आठवीच्या गटात प्रथम मिळवला.
स्पर्धेतील इतर विजेते पुढील प्रमाणे-
इयत्ता 8 वी
प्रथम क्रमांक अर्जुन चौगुले
द्वितीय क्रमांक आरुष माने
तृतीय क्रमांक अध्विक विचारे
इयत्ता 7 वी
प्रथम क्रमांक ध्रुव गोयल
द्वितीय क्रमांक श्रवण ठोंबरे
तृतीय क्रमांक अमेय कर्वेकर
इयत्ता 6 वी
प्रथम क्रमांक सिया परांजपे
द्वितीय क्रमांक ऋतुजा हेंडगे
तृतीय क्रमांक मंथन सातपुते
इयत्ता 5 वी
प्रथम क्रमांक शारंग भोईटे
द्वितीय क्रमांक हर्ष मदनाईक
तृतीय क्रमांक आदित्य सूर्यवंशी
इयत्ता 4 थी
प्रथम क्रमांक जय पाटील
द्वितीय क्रमांक वीरेन पाटील
तृतीय क्रमांक विवान चौगुले
इयत्ता 3 री
प्रथम क्रमांक हर्ष कांबळे
द्वितीय क्रमांक शिवेंद्र पवार
तृतीय क्रमांक स्वयम चव्हाण
इयत्ता 2 री
प्रथम क्रमांक विवान परांजपे
द्वितीय क्रमांक देवश्री अडनाईक
तृतीय क्रमांक श्रीहर्ष होनकट्टी
बालवाडी आणि पहिली
प्रथम क्रमांक राजवर्धन मोरे
द्वितीय क्रमांक शानवी खोत
तृतीय क्रमांक रिधानसिंह शिंदे
उत्कृष्ट शाळा
प्रथम क्रमांक विद्यापीठ हायस्कूल कोल्हापूर
द्वितीय क्रमांक सिम्बॉलिक इंटरनॅशनल स्कूल
तृतीय क्रमांक माईसाहेब बावडेकर विद्यालय
चौथा क्रमांक सन किड्स इंग्लिश स्कूल
स्पर्धेमध्ये एकूण 160 खेळाडूंनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी पंच म्हणून इचलकरंजी चेस अकॅडमीचे शैलेश होनकट्टी, कपिल ठोमके, प्रियंका ठोमके, तृप्ती देसाई यांनी काम पाहिले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार माननीय सुभाष कांबळे रयत गुरुकुल पब्लिक स्कूल कुंभोजच्या प्रिन्सिपल तेजस्विनी आडनाइक, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे माजी सचिव कृष्णात पाटील, अनुज् चेस अकॅडमीचे अनुराग पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले.
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अनुज चेस अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक बाबूराव पाटील, अनुष्का पाटील, अनुज पाटील यांनी परिश्रम घेतले.