SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गतिमान नेतृत्व, विकासाची दृष्टी आणि सामाजिक बांधिलकीचा संगम : संजय पाटील यड्रावकर जागतिक प्रगतीचा पाया: आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनकोल्हापुरात १७ सप्टेंबरपासून लष्कर भरती मेळावालोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलबालिंगा-चंबूखडीच्या मेन पाईपलाईनवरील 'महा-गळती'मुळे सलग दोन दिवस कोल्हापूर शहरातील काही भागात पाणी पूर्णपणे होणार गुल कोल्हापूर : शाहू क्लॉथ मार्केटमधील थकबाकी असलेले 60 गाळे सीलमहापालिका कामांना गती देत विभागीय स्तरावर निर्णयक्षमता वाढविण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देशनाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या : डॉ. राकेश कुमार शर्माशिवाजी विद्यापीठात फुलले ‘कास’...!मुंबई उपनगर जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

जाहिरात

 

केडीसीसी बँक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत राज्यात अग्रभागी

schedule22 Aug 26 person by visibility 309 categoryउद्योग

▪️राज्यात कोल्हापूर जिल्हा व जिल्ह्यात केडीसीसी अग्रभागी
▪️कोल्हापूर जिल्हा गुंतवणूक परिषदेत सन्मान* 
​         
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत अर्थसहाय्यामध्ये राज्यात नवा विक्रम केला. या योजनेतील अर्थसहाय्यामध्ये कोल्हापूर जिल्हा सबंध महाराष्ट्रात आघाडीवर आहे. तर केडीसीसी बँक कोल्हापूर जिल्ह्यात आघाडीवर आहे. याबद्दल कोल्हापूर जिल्हा गुंतवणूक परिषदेमध्ये केडीसीसी बँकेचा पारितोषिक देऊन गौरव झाला.
​             
औद्योगिक संचालनालय संचलित जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने या कोल्हापूर जिल्हा गुंतवणूक परिषदेचे आयोजन केले होते. 
           
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या अर्थसहाय्यामध्ये सबंध महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे, याचा अभिमान आणि गौरव वाटतो. कोल्हापूर जिल्ह्याला आघाडीवर ठेवण्यामध्ये केडीसीसी बँकेचे योगदान मोठे आहे, हेही महत्त्वाचे आहे.   
            
या योजनेतील उत्कृष्ट कामाबद्दल बँकेच्या केंद्र कार्यालयासह बँकेच्या म्हाकवे, कसबा सागाव, मुरगुड, कोतोली, गडहिंग्लज शहर या शाखांचाही गौरव झाला. तसेच; बँकेच्या केंद्र कार्यालयातील कर्मचारी  इंद्रजीत घाटगे यांनाही उत्कृष्ट कामगिरीबद्दल वैयक्तिक पुरस्कार मिळाला. या आर्थिक वर्षात एकूण ८७५ कर्ज प्रस्ताव मंजूर करून इष्टांकाच्या २३३ टक्के कामगिरी केली. बँकेने राज्य सरकारने दिलेल्या उद्दिष्टाच्या तब्बल २३३ टक्के काम पूर्ण केले आहे. गेल्या वर्षीही बँकेला या योजनेतील उच्चांकी कामकाजाबद्दल प्रथम पुरस्कार मिळाला होता. 
            
यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे म्हणाले, बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संचालक मंडळ यांची प्रेरणा. अधिकारी, कर्मचारी व समस्त शेतकऱ्यांच्या संघटित प्रयत्नांचे ही फलित आहे. 
            
या गुंतवणूक परिषदेला आमदार अशोकराव माने (बापू), जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, पुणे विभागाचे सह आयुक्त संदीप रोकडे, जिल्हा उद्योग केंद्राच्या उपायुक्त डाॅ. विद्या कुलकर्णी, आदी प्रमुख उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes