SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिरोळ तालुक्यातील रस्ते विकासाला प्राधान्य : आमदार यड्रावकरमांगनूर येथील रस्ता गावाबाहेरून काढाकेडीसीसी बँक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत राज्यात अग्रभागी मद्रास दिवस: दक्षिण भारताच्या सांस्कृतिक राजधानीचा ऐतिहासिक प्रवासकल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर कारखान्यास सर्वाेत्कृष्ट पुरस्कार प्रदानसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जागतिक उद्योजक दिवस उत्साहात साजराकोल्हापूर महापालिका नगरसेविका ॲड. मानसी लोळगे यांचा गंभीर आरोप; तानाजी जाधवविरुद्ध पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रारडी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजमध्ये उद्या शनिवारी सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शनडी.वाय.पी. ग्रुपतर्फे महानगरपालिकेला १५५० एलईडी दिव्यांची भेटवैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची कोल्हापुरात महत्त्वपूर्ण प्रेस कॉन्फरन्स; ऊस, गोकुळ आणि 'शक्तिपीठ'बाबत रोखठोक भूमिका

जाहिरात

 

शिरोळ तालुक्यातील रस्ते विकासाला प्राधान्य : आमदार यड्रावकर

schedule22 Aug 26 person by visibility 142 categoryराज्य

▪️६ कोटींच्या निधीतून कुरुंदवाड–नांदणी रस्त्याच्या कामाचा प्रारंभ 

कुरुंदवाड : दरवर्षी पुराच्या पाण्याचा तडाखा सहन करणाऱ्या आणि नांदणीच्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी ठरलेल्या कुरुंदवाड–नांदणी रस्त्याला आता ६ कोटींच्या निधीतून मजबुती मिळणार आहे. काँक्रीटीकरण व डांबरीकरणाच्या माध्यमातून हा मार्ग अधिक टिकाऊ आणि सुरक्षित करण्यास प्राधान्य दिले असून, शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारपेठेत वेळेत पोहोचला पाहिजे; त्यासाठी रस्ते विकासाला प्राधान्य देण्यात आले  आहे असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी  केले.
  
केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत कुरुंदवाड–नांदणी प्रमुख जिल्हा मार्ग ७३ च्या काँक्रीटीकरण व डांबरीकरणासाठी मंजूर झालेल्या ६ कोटी रुपयांच्या विकासकामाचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला, या प्रसंगी ते बोलत होते.

आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील रस्ते हे केवळ वाहतुकीचे साधन नसून शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाचा महत्त्वाचा दुवा आहेत. त्यामुळे तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी शासनाकडून निधी मिळवून देण्यास आपले प्राधान्य राहणार असल्याचे आमदार यड्रावकर यांनी सांगून कुरुंदवाड–नांदणी हा शिरोळ तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. नांदणीसह परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला व अन्य शेतमाल कुरुंदवाडच्या बाजारपेठेत आणतात. मात्र, दरवर्षी पुरामुळे या रस्त्याची दुरवस्था होत असल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता. ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 काँक्रीटीकरण व डांबरीकरणामुळे हा मार्ग अधिक मजबूत आणि सुरक्षित होईल. शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी आगामी काळातही रस्ते विकासाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या प्रचिता कोळी, कुरुंदवाडच्या नगराध्यक्ष मनीषा डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, संजय बोरगावे,सागर शंभुशेटे, प्रकाश लठ्ठे, बाबासाहेब बागडी, पी.एल.आंबी, इब्राहिम मोमीन, 
नगरसेवक जय कडाळे, वैभव उगळे, दीपक परिट, तानाजी आलासे, जवाहर पाटील, अक्षय आलासे, दादासो पाटील, रामदास मधाळे, महावीर पाटील, दीपक पोमाजे, बाळासो दिवटे, बाबासो बागडी, सुरेश भोसले, बाबासो सावगावे, रोपन जोंग, शब्बीर बागवान, अल्ली बागवान यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

🟢 आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून रस्ते विकासासाठी १३ कोटी ३७ लाख ५० हजारांचा निधी

सन २०२२-२३ मध्ये काँक्रीटीकरणासाठी २ कोटी ३७ लाख, सन २०२३-२४ मध्ये काँक्रीट रोडसाठी ३ कोटी ५० लाख, सन २०२५ मध्ये काँक्रीट रोडसाठी १ कोटी ५० लाख, तर आता ६ कोटींचा निधी उपलब्ध झाला असून एकूण १३ कोटी ३७ लाख ५० हजारांचा निधी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून मिळाला आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes