SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; भीतीपोटी अनावश्यक खरेदी टाळावी : मंत्री छगन भुजबळकोल्हापुरात दोन दुचाकी चोरांसह एका अल्पवयीन मुलाला अटक; २.२५ लाखांच्या ४ गाड्या जप्त'चालुक्याज क्रीडा महोत्सव २०२६': बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा कोल्हापुरात दिमाखदार शुभारंभ!डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड'ने सन्मान; उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते गौरवघोडावत विद्यापीठात होणार जागतिक दर्जाचे डिझाईन स्कूल हॅमस्टेक कॉलेज सोबत सामंजस्य करार; डिझायनर नीता लुल्ला यांची उपस्थितीनिसर्गाचा अनमोल ठेवा: जागतिक जैवविविधता दिनकोल्हापुरात इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसचे जोरदार आंदोलनकोल्हापुरात खळबळ: भाऊसिंगजी रोडवरून ३० तोळे सोन्याचे दागिने लंपास!घोडावत विद्यापीठातील 49 विद्यार्थ्यांची निवडप्रतीक्षा संपली! डॉ. रजनीश कामत शिवाजी विद्यापीठाचे नवे कुलगुरू

जाहिरात

 

पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध; भीतीपोटी अनावश्यक खरेदी टाळावी : मंत्री छगन भुजबळ

schedule22 May 26 person by visibility 104 categoryराज्य

◼️मे महिन्यात नेहमीपेक्षा 20 टक्के अधिक पेट्रोल-डिझेल विक्री झाल्याची माहिती

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात इंधनटंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र, महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले की, राज्यात कोणत्याही प्रकारची इंधनटंचाई नाही. त्यामुळे नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल-डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसांत अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20 टक्के अधिक पेट्रोल-डिझेलची विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली.

केंद्र व राज्य शासन प्रत्येक नागरिकाला पुरेशा प्रमाणात इंधन उपलब्ध करून देण्यास सक्षम आहेत. त्यामुळे अफवा किंवा भीतीच्या वातावरणामुळे अतिरिक्त साठा करण्याची आवश्यकता नाही,” असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

यावेळी त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील गेल्या काही दिवसांतील इंधन विक्रीची आकडेवारीही माध्यमांसमोर मांडली. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes