SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डिग्री इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट शासनमान्य स्क्रुटनी केंद्रजेव्हा जगाने पाहिली पहिली टीव्ही बातमी: बीबीसीच्या क्रांतीचा एक प्रवासस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची १५ जुलै रोजी प्रवेश परीक्षाकोल्हापुरात पावसाचा जोर कायम: पंचगंगेची पाणी पातळी २५ फुटांवर; २० बंधारे पाण्याखालीआपत्तीमध्ये तत्काळ प्रतिसाद द्या; पुढील पाच दिवस सर्व यंत्रणा सतर्क ठेवा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडसायबर जनजागृती, डिजिटल साक्षरता काळाची गरज : महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेबाजार भोगाव येथे NDRF कडून समुदाय जनजागृती व बोट प्रशिक्षणकोल्हापूर पोलिसांची धडक कारवाई; व्हिसा संपलेला कांगो नागरिक हद्दपारगोडसाखरच्या कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्यांचा प्रश्न निघाला निकाली घोडावत विद्यापीठातील फार्मसीच्या विद्यार्थ्याला ३८.४३ लाखाचे पॅकेज

जाहिरात

 

डिग्री इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेसाठी डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट शासनमान्य स्क्रुटनी केंद्र

schedule05 Jul 26 person by visibility 110 categoryशैक्षणिक

कोल्हापूर  : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी , कोल्हापूर हे अभियांत्रिकी महाविद्यालय  डिग्री  इंजिनिअरिंग  (बी.टेक.) प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र शासनमान्य स्क्रुटनी  केंद्र म्हणून कार्यरत असून प्रक्रियेसंदर्भातील सर्व सुविधा विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी मोफत उपलब्ध करून दिल्या  आहेत.

 केंद्रामध्ये ऑनलाइन अर्ज भरणे,  कागदपत्रांचे स्कॅनिंग, कागदपत्रांची पडताळणी, कागदपत्रे अपलोड करणे , अर्ज निश्चिती अशा सर्व सुविधा उपलब्ध असून ,  इंजिनिअरिंग  नंतरच्या व्यवसाय /नोकरीच्या  संधी, कॅप राउंडची संपूर्ण माहिती तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत दिली जात आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी इन्स्टिट्यूटने  विशेष नियोजन केले आहे. " स्टेट सीईटी सेल कडून  आयोजित  इंजिनिअरिंग प्रवेशासाठी दिनांक  12 जुलैपर्यंत  अर्ज निश्चिती करण्याची आहे. सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच उपलब्ध सर्व शिष्यवृत्ती आणि विविध शासकीय योजना यांची सविस्तर माहिती सुविधा केंद्रामार्फत देत आहोत. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रविवारसह सर्व दिवस सुविधा केंद्र सुरू असेल " अशी माहिती संस्थेच्या व्यावसायिक  शिक्षण समूहाचे संचालक प्राचार्य विरेन भिर्डी  यांनी दिली. 

इंजिनिअरिंगमधील विविध अभ्यासक्रमांचे  माहितीदर्शक फलक इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. सुहास सपाटे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रदर्शित केले आहेत .

 तरी सर्व इच्छुक विद्यार्थी व पालकांनी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे व मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी केले आहे .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes