SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राधानगरी भरले 99.51 टक्के; कोल्हापूर जिल्ह्यातील 37 बंधारे पाण्याखालीकोल्हापूर जिल्ह्यात 12 ऑगस्टपर्यंत बंदी आदेश लागूएक थरार....बालंबाल बचावलो.. .डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचा ‘बेस्ट इन्स्टिट्यूट’ पुरस्काराने सन्मान; आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते गौरव स्वमान सोशल मानवाधिकार परिषद संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नारायण पोवार यांचा सत्कारकोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशनच्या वतीने “वेल्थ कॉन” चे आयोजनसरकारी नोकरीच्या आमिषाने आणखी एक फसवणूक; मुख्यमंत्र्यांनी SIT नेमावी - 'आप'ची आक्रमक मागणीमहाकवी संत तुलसीदास: भक्ती, साहित्य आणि लोकमानसाचे शिल्पकारयड्राव बँकेची वाटचाल कौतुकास्पद : भालचंद्र पाटील; यड्राव बँकेच्या नेमीनाथनगर शाखेचे उद्घाटन एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

जाहिरात

 

एक थरार....बालंबाल बचावलो.. .

schedule30 Jul 26 person by visibility 162 categoryसामाजिक

कोल्हापूर : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती....नशीब बलवत्तर म्हणून बचावलो. एक थरारक अनुभव अंगावर शहारे आणणारा मात्र जरूर ठरला 
त्याचे असे झाले...सोमवार 20 जुलै 2026 चा तो दिवस.वेळ 
दुपारची. ऊन पावसाचा खेळ चालू होता. एक वाजून 45 मिनिटे झाली होती.  मी डॉ राजेंद्र भस्मे स्कूटरने टायटन चौकात पोहोचलो. चौकात सिग्नल मिळाल्याबरोबर उजवीकडे वळण घेतले आणि.  त्याचवेळी दसरा चौकातून येणाऱ्या चारचाकी टाटा नेक्सन मोटारीने  तिरके जोरात येऊन  एक वाजून 47 मिनिटांनी मिनिटानी धडक मारली  धाडकन पडलो. नशीब बलवत्तर म्हणून वाचलो. नाही तर चाकाखाली सापडलो असतो. मग काय खरं नव्हतं.

 खरं तर 
 या रोडनं मी कधीच जात नाही. कारण सीपीआर वरून सरळ पुढे गेले की  नागाळा पार्कात जाता येते. पण डॉक्टर सागावकर यांचे श्री साई नर्सिग व्हीनस  कॉर्नर जवळ पडेल म्हणून हा रस्ता निवडला.


 सिग्नल सुरू झाल्यानंतर बाहेर पडलो. पुढच्या गाड्या थांबल्या होत्या पण हे मोटार वाले महाशय मात्र जोरात आले आणि जरा तिरके होत माझ्या गाडीला धडक दिली. वयोवृद्ध ड्रायव्हर चालवत होते त्यांना कदाचित उजव्या बाजूला दिसले नसेल. नंतर  ट्रॅफिक पोलीस आले.  तक्रार आहे का विचारले त्यावर आमची काही तक्रार नाही असे मी म्हणलं.  जिवंत राहिलो  भरपूर झालं असे मनोमन वाटले आणि तिथून  निघून गेलो..

मी कोण आहे? चूक कोणाची? याची चर्चा करण्यात अर्थ नाही असे वाटले...अशावेळी हुज्जत घालणे हा माझा स्वभाव नाही. मी स्वतः एक डॉक्टर,पत्रकार आहे असे ओरडून सांगितले असते तर  कदाचित काही आणखी वेगळे चित्र त्या गर्दीत दिसले असते....पण जावू द्या म्हटले आणि पुढे मार्गस्थ झालो. 
..एक थरारक अनुभव घेऊन.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes