+91 74474 43501, +91 8888260551 | smpnewsnetworks@gmail.com |
Breaking News
adjustविद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करावा, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांचे आवाहन adjustमोबाईलवर तलवारीचे स्टेटस ठेवणाऱ्या दोघांना अटक; तलवार जप्त adjustबेकायदेशीर हत्यारे विक्री करणेस आलेले एका आरोपीस अटक; 01 गावठी बनावटीचे पिस्टल जप्त adjustसंधीचा सदुपयोग करा : विजय भंडारी; कोल्हापूर जितोचा पदग्रहण उत्साहात adjustशिवाजी विद्यापीठात महर्षी वाल्मिकी जयंती adjust'तेंडल्या' चित्रपटाचे शनिवारी विद्यापीठात स्क्रीनिंग adjustजागतिक अन्न दिनानिमित्त उद्या शुक्रवारी विद्यापीठात विविध उपक्रम adjustनायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री adjustबायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती; शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वकडून हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅपच्या १० शिक्षकांचा "बिल्डर्स ऑफ नेशन" ने सन्मान
schedule07 Apr 23 person by visibility 658 categoryसंपादकीय
भारतात अंधत्व दूर करण्याकरीता स्वतंत्रपणे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम सन १९७६ पासून राबविण्यात येत आहे. अंधत्वाची समस्या दूर करण्यासाठी दृष्टी २०२० हे अभियान भारतात राबविण्यात येत आहे. भारतात सन २०२० पर्यंत 0.3 टक्के इतके अंधत्वाचे प्रमाण कमी करण्याचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.
 
महाराष्ट्रात एकूण २२५ नेत्रपेढ्या आहेत. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या नेत्र पेढ्या आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व महानगरपालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय येथे या नेत्रपेढ्या आहेत. आपल्या नातेवाईकांच्या अपघाती वा अन्य कारणाने मृत्यू आल्यास नजिकच्या नेत्रपेढीस दुरध्वनीवरून कळवल्यास नेत्र घेण्यासाठी नेत्रपेढीचे प्रतिनिधी येतात. एखाद्या व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तींना दृष्टी लाभू शकते. त्यामुळे मरणोत्तरही मृत व्यक्तिकडून सत्कार्य होऊ शकते, म्हणून नेत्रदानाबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे.
 
दृष्टीहिनता एकाच प्रकारची नसते. काहिंना अजिबात दिसत नाही, काहींना रातआंधळेपणा असतो म्हणजे प्रकाशाची तीव्रता अपूरी असते तेव्हा त्या व्यक्तीस अजिबात दिसत नाही. ही अवस्था रात्री असते. काही मुलांमध्ये दृष्टीदोष अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. योग्य उपचार न केल्यास अंधत्व येण्याचा धोका संभवतो.
 
आपल्या सभोवती आपण बऱ्याच वेळा चष्मा वापरणाऱ्या व्यक्ती पाहतो. चष्मा लागणे हा कोणताही रोग नसून दृष्टीदोष कमी करण्यासाठीचा प्रथमोपचार आहे. शाळेत फळ्यावरचे न दिसणे ही शाळेतल्या मुलांची तक्रार सर्वसाधारपणे आढळते म्हणून पालकांनी याकडे दुर्लक्ष करु नये. योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य उपचार घ्यावा.
 
वयाच्या चाळिशीनंतर वृध्दापकाळामुळे जसे केस पांढरे होणे, सुरकुत्या पडणे त्याप्रमाणे आपल्या डोळ्यातील भिंगाची आकुंचन व प्रसरण होण्याची क्षमता कमी होऊ लागते. दूर पाहताना आपले हे भिंग किंचित चपटे होते व जवळ जवळ पाहता फुगीर होते त्यामुळे आपण दूरवरचे विना चष्मा पाहू शकतो. वयाच्या चाळीशीनंतर दिसण्याची ही क्षमता जवळच्यासाठी कमी होऊ लागते. त्यामुळे अधिक नंबरच्या चष्म्याची गरज भासते. ही अवस्था प्रत्येकाच्या चाळीशीला येते.
 
अंधत्व जनजागृती सप्ताहाच्या निमिताने दृष्टीदोष घालविण्यासाठी जास्त वेळ टिव्ही पाहणे, संगणकावर बसणे, तासनतास मोबाईलवर गेम खेळणे, डोळ्याच्या दुखऱ्या भागाकडे दुर्लक्ष करणे, या पासून परावृत होऊन अंधत्वाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी जनजागृती अभियान मोहीमेत प्रत्येकाने सहभागी होऊन राष्ट्र अंधत्वमुक्त करण्यास सहभागी होऊ या.

🟠 डोळ्यांची सुरक्षीतता:-
 
रोज सकाळी उठल्याबरोबर पाण्याने डोळे धुवावेत.  दुसऱ्यांनी वापरलेले टॉवेल व रुमाल वापरु नये. स्वतःचा रुमाल व टॉवेल वापरावा.  डोळ्यात सुरमा व काजळ घालू नये. डोळ्यात कचरा गेल्यास डोळा चोळू नये त्यामुळे ते अधिक आत रुतण्याची शक्यता असते. मोठ्या बादलीत पाणी घेऊन श्वास बंद ठेवून पाण्यात डोळ्याच्या पापण्यांची उघडझाप करणे, कचरा निघत नसल्यास तात्काळ डोळ्याच्या डॉक्टरकडे पाठवावे. मुलांना खेळण्यासाठी अणकुचीदार खेळणी विटी-दांडू घातक ठरु शकतो. बंदूक, बाण हे खेळणे टाळावे. यामुळे दुरुन देखील डोळ्यांना इजा पोहचू शकते. लहान मुलांना कात्री, पेन्सिल, धनुष्यबाण इत्यादी धोकादायक खेळ खेळत असताना मुलांकडे लक्ष ठेवावे. लहान मुलांना दिवाळीत फटाके उडवू देवू नये. आतिषबाजी करताना जवळ उभे राहू नये कारण फटाके उडविताना निष्काळजीपणा झाल्यास ठिणग्या उडून डोळे कायमचे निकामी होऊ शकतात.

 वेल्डींगच्या कामामुळे सुध्दा अपघात होऊ शकतो. त्यासाठी योग्य तो चष्मा वापरावा. उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे व प्रखर प्रकाशाकडे पाहू नये. होळीमध्ये रंग खेळताना रसायनयुक्त रंगाचा वापर टाळावा. नैसर्गिक रंगाचा उपयोग करावा व रंग डोळ्यात जाणार नाही, याची काळजी घ्यावी. डोळ्यात रसायन पडल्यास डोळे भरपूर पाण्याने त्वरीत धुवावे. नियमित उपयोगात येणारे अणकुचीदार वस्तू खेळणी, चाकू, सुरी तसेच कात्री लहान मुलांपासून दूर ठेवावी.

६ वर्षाखालील बालकांना “अ” जीवनसत्व अतिरीक्त डोस पाजावा. मातांना बालकाच्या पौष्टिक आहाराबाबत जागृत करावे “अ” जीवनसत्व अभावी मुलांना रातआंधळेपणा येऊ शकतो. मुलांनी टीव्ही पाहताना टीव्ही पासून कमीत कमी १० फुटांचे अंतर असावे.
 
  ✍ प्रचार्य
 आरोग्य व कुटूंब कल्याण
 प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर