रक्तदान महायज्ञ उपक्रमास मोठा प्रतिसाद
schedule20 Jan 25 person by visibility 189 categoryसामाजिक
कोल्हापूर : जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान मार्फत 4 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये रक्तदान महायज्ञ हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातून एक लाख रक्त कुप्पिकांचे संकलन करण्याचा निर्धार होता. तो निर्धार दिनांक 17 जानेवारी पर्यंत पूर्ण झाला. तसेच 19 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील रक्तदानाचा कार्यक्रमाचा सांगता झाली या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात 6 ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
कसबा बावडा येथे आज रक्तदान शिबिराला कोल्हापूर जिल्ह्यातील नेते मंडळींनी भेटी दिल्या त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक ,आमदार राजेश श्रीरसागर , सत्यजित उर्फ नाना कदम , माजी नगरसेवक अशोक जाधव , शिवसेना शाखाप्रमुख संजय जाधव यांनी भेटी देऊन रक्तदात्यांशी संभाषण करून जगद्गुरु माऊली विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या .
कोल्हापूर जिल्ह्यात 4 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान एकूण 45 रक्तदान कॅम्प आयोजित करण्यात आले होते. सर्वच ठिकाणी रक्तदानासाठी महीलाचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रमाणात आढळून आला आहे या सर्व कँपचे नियोजन स्वरूप संप्रदाय कोल्हापूर जिल्हा कमिटी,तालुका कमिटी, सेवाकेंद्र कमिटी, महीला सेना, संग्राम सेना, सर्व भक्तगण, तसेच अर्पण ब्लड बँक, जीवनधारा ब्लड बँक,महालक्ष्मी ब्लड बँक, संजीवन ब्लड बँक,महात्मा गांधी हॉस्पिटल ब्लड बँक,वैभव लक्ष्मी ब्लड बँक यांनी केले.