SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपशिवाजी विद्यापीठात अर्थसंकल्पावर विशेष परिसंवादनिवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी मुंबई येथे 58 वी पेन्शन अदालतमराठा दिननिमित्त ‘पर्वत ते सागर’ सायकल मोहिमेचे बुधवारी आयोजनव्यवसाय वृध्दी व उत्पादनाची पोर्टलवर होणार जाहिरातकोरे अभियांत्रिकी व टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स यांच्यात सामंजस्य करारकोल्हापूर महानगरपालिका महापौर, उपमहापौर निवड : महायुती, महाविकास आघाडीकडून अर्ज दाखलजिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीस मतदान; उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टीमुलांमधील डिजिटल व्यसनाच्या अभ्यासासाठी तज्ज्ञांचा टास्क फोर्स नियुक्त करा : माहिती तंत्रज्ञान मंत्री अ‍ॅड. आशिष शेलारविद्यापीठस्तरीय रँकिंगमध्ये रसायनशास्त्र, अर्थशास्त्र अधिविभाग सर्वोत्कृष्ट; कामगिरीत सातत्य राखावे: कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी

जाहिरात

 

व्यवसाय वृध्दी व उत्पादनाची पोर्टलवर होणार जाहिरात

schedule03 Feb 26 person by visibility 116 categoryराज्य

कोल्हापूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळच्या लाभार्थीसाठी  महामंडळच्या अधिकृत  www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर Business Promotion (व्यवसाय वृद्धी) हा स्वतंत्र टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महामंडळचे  लाभार्थी आपली सेवा, उत्पादने त्यांची किंमत तसेच वैशिष्ट्ये यासह व्यवसायाशी संबंधित सविस्तर माहिती पोर्टलवर अपलोड करू शकणार आहेत.

या अंतर्गत लाभार्थ्यांना व्यवसायाचे नाव, व्यवसायाचा प्रकार, उत्पादने अथवा सेवा, किंमत, वैशिष्ट्ये, संपर्क तपशील व इतर आवश्यक माहिती पोर्टलवर नोंदविता येणार आहे.  या उपक्रमामुळे लाभार्थ्याच्या व्यवसायाचा विस्तार होण्यास चालना मिळेल. स्थानिक उत्पादने व सेवा ग्राहकांना सहज उपलब्ध होतील. तसेच महामंडळाच्या लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यास मदत होईल.

 महामंडळाच्या सर्व संबंधित लाभार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपली आवश्यक माहिती तात्काळ पोर्टलवर अपलोड करावी. याबाबत कोणतीही अडचण अथवा मार्गदर्शनासाठी संबंधित जिल्हा समन्वयकांशी संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजायसिंह देशमुख यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes