मराठा दिननिमित्त ‘पर्वत ते सागर’ सायकल मोहिमेचे बुधवारी आयोजन
schedule03 Feb 26 person by visibility 110 categoryसामाजिक
कोल्हापूर : मराठा बटालीयन, औंध मिलिटरी तळ यांच्यामार्फत स्वराज्याचे शिलेदार वीर तानाजी मालुसरे यांचे सिंहगडच्या लढाईतील (1670) अत्युच्च शौर्य व बलिदानाचे तसेच मराठा वीरांच्या असीम त्याग, पराक्रम व गौरवशाली वारशाचे स्मरण करण्याच्या हेतूने 4 फेब्रुवारी रोजी ‘मराठा दिन’ साजरा करण्यात येणार आहे.
या उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘पर्वत ते सागर’ अशी सायकल मोहिम आयोजित करण्यात आली असून या मोहिमेत सैन्यदलाचे वरिष्ठ अधिकारी, एक JCO व 15 OR सहभागी होणार आहेत. या यात्रेदरम्यान सायकलपटूंसाठी पाण्याची व्यवस्था, यात्रेच्या मार्गावरील ट्रॅफिक नियोजन व आवश्यक पोलीस बंदोबस्त तसेच यात्रामार्गावर वैद्यकीय पथक (रुग्णवाहिकेसह) उपस्थित राहणार आहे.
ही सायकल यात्रा सिंहगड किल्ला, पुणे येथून 4 फेब्रुवारी रोजी निघून प्रतापगड, सातारा मार्गावरून 8 फेब्रुवारी रोजी कराडहून विशाळगड, 9 फेब्रुवारी रोजी विशाळगड ते पन्हाळामार्गे कोल्हापूर शहर आणि 10 फेब्रुवारी रोजी कोल्हापूर ते बेळगाव (कागलमार्गे) जाणार आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी दिली.