SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
संख्याशास्त्र अधिविभागातून पहिला आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पीएच.डी.स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारासाठी 31 जानेवारीपर्यंत प्रवेशिका पाठवण्याचे आवाहनडॉ. डी. वाय. पाटील बी. टेक. (ऍग्री) चा विद्यार्थी कृषी शास्त्रज्ञकेआयटी चा शाहू माने राष्ट्रीय विजेता ; राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेत सुवर्णपदकराज्यात 27-28 डिसेंबरदरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज'दिलखुलास', कार्यक्रमात दंत शल्यचिकित्सक डॉ. अर्चना पवार यांची मुलाखतलाडकी बहीण योजना बंद, 'या' राज्य सरकारने थेट जाहिरातच काढलीमाजी क्रिकेटपटू विनोद कांबळीसाठी धावून आले संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे फाउंडेशनकोल्हापूर महानगरपालिका : टिप्पर चालकांचे फाळणी पुस्तक गहाळ हा तर स्कॅम 2024; 'आप'चा आरोपकूर येथे कालव्यात ट्रॅक्टर पडून चालक ठार

जाहिरात

 

स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारासाठी 31 जानेवारीपर्यंत प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन

schedule26 Dec 24 person by visibility 86 categoryराज्य

     कोल्हापूर : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड:मय निर्मितीसाठी राज्य शासनाच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार योजना जाहीर झाली असून यासाठी 31 जानेवारी 2025 पर्यंत प्रवेशिका पाठवाव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांनी केले आहे.

    मराठी भाषेतील उत्कृष्ठ वाड:मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष 2024 करिता राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कारासाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून) तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 1 ते 31 जानेवारी 2025 पर्यंत पाठविता येणार आहेत. दिनांक 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी मुंबई 400025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील.
      महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर 'नवीन संदेश' या सदरात 'स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार 2024 नियमावली व प्रवेशिका' या शीर्षाखाली व 'What's new' या सदरात Late Yashwantrao Chavan State Literature Award 2024 Rules Book and Application Form या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या https://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील.
   
     प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक कागदपत्रांसह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दिनांक 1 ते 31 जानेवारी 2025 या विहित कालावधीत पोहचतील अशा पाठवाव्यात. लेखक, प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक, प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी मुंबई 400025 येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक, प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे साहित्य दिनांक 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2025 या विहित कालावधीत पाठवावे. लेखक, प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना बंद लिफाफ्यावर, पाकीटावर स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड:मय पुरस्कार 2024 साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 31 जानेवारी 2025 राहिल. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत.

जाहिरात

 
Copyright © 2024. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes