संख्याशास्त्र अधिविभागातून पहिला आंतरराष्ट्रीय विद्यार्थी पीएच.डी.
schedule26 Dec 24 person by visibility 134 categoryशैक्षणिक
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागातून आज पहिल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्याने पीएच.डी. पदवी प्राप्त केली. महम्मद खादीम शन्शुल असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो इराकचा नागरिक आहे.
श्री. शन्शुल यांनी संख्याशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ॲडव्हान्स्ड नॉन पॅरामेट्रिक कंट्रोल चार्ट्स’ या विषयावर शिवाजी विद्यापीठास प्रबंध सादर केला.
संख्याशास्त्र विषयाचे प्राध्यापक असणारे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी महम्मद शन्शुल यांचे विशेष अभिनंदन केले.