कोल्हापूर जिल्ह्यात 22 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबीर अभियानाचे आयोजन
schedule21 Jul 26 person by visibility 140 categoryराज्य
कोल्हापूर : जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ अंतर्गत 22 जुलै ते 2 ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात उपविभागीय अधिकारी त्यांच्या उपस्थितीत राबविण्यात येणार आहे त्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :-
275 करवीर विधानसभा मतदारसंघ - श्री विठाई चंद्राई सांस्कृतिक हॉल मौजे वाकरे (गगनबावडा रोड) ता. करवीर येथे 22 जुलै रोजी सकाळी 11 वाजता हेमंत निकम जिल्हा पुर्नवसन अधिकारी कोल्हापूर (संपर्क क्र. 9767072331)
276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ- महासैनिक दरबार हॉल कोल्हापूर येथे 22 जुलै रोजी सकाळी 10 वाजता संपत खिलारी उपजिल्हाधिकारी महसूल जिल्हा अधिकारी कार्यालय कोल्हापूर (संपर्क क्र.9011027027 )
272 राधानगरी विधानसभा मतदारसंघ- मुनींद्र पेलेस कलनाकवाडी ता. भुदरगड येथे 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता हरेश सूळ उपविभागीय अधिकारी भुदरगड (संपर्क क्र. 9852432222)
274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ- यशवंत हॉल मुडशिंगी ता. करवीर येथे 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता मोसमी चौगुले उपविभागीय अधिकारी करवीर (संपर्क क्र. 9423572931)
271 चंदगड विधानसभा मतदारसंघ- अनिकेत मंगल कार्यालय मौजे महागाव ता. गडहिंग्लज येथे 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता एकनाथ काळबांडे उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज (संपर्क क्र. 9689955450)
277 शाहुवाडी विधानसभा मतदारसंघ - श्री स्वामी मंगलधाम मंगल कार्यालय मौ. ठमकेवाडी ता. शाहुवाडी येथे 30 जुलै रोजी सकाळी 11 वाजता समीर शिंगटे उपविभागीय अधिकारी पन्हाळा (संपर्क क्र. 9423041444 )
273 कागल विधानसभा मतदारसंघ- आर के मंगल कार्यालय बामणी ता. कागल येथे 31 जुलै सकाळी 9 वाजता प्रसाद चौगुले उपविभागीय अधिकारी राधानगरी (संपर्क क्र. 7769087577)
279 इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ- राजीव गांधी सांस्कृतिक भवन विक्रमनगर इचलकरंजी येथे 31 जुलै रोजी सकाळी 11 वाजता दीपक शिंदे उपविभागीय अधिकारी इचलकरंजी (संपर्क क्र. 9960600975)
280 शिरोळ विधानसभा मतदारसंघ- तारे मंगल कार्यालय शिरोळ येथे 31 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अर्चना नष्टे उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. 6 कोल्हापूर यांच्या उपस्थितीत होणार आहे. (संपर्क क्र. 7588608120)
278 हातकणंगले विधानसभा मतदारसंघ- विशाल मंगल कार्यालय चोकाक ता. हातकणंगले येथे 2 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता शक्ती कदम उपजिल्हाधिकारी रो.ह.यो. (संपर्क क्र. 9975639961)
जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर पत्नी, वीर माता, वीर पिता व अवलंबित यांच्या कोणत्याही महसूल जमिनी, दाखला, फेरफार नोंदी, मोजणी संदर्भात तक्रारी असतील तरी संबधीतांनी वरील सुधारित वेळापत्रकाप्रमाणे संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भीमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.