जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराला हृदयविकाराचा झटका
schedule31 Oct 24 person by visibility 237 categoryराजकीय
नाशिक : जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघातील शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे उमेदवार प्रभाकर सोनवणे यांना गुरूवारी हृदयविकाराचा झटका आला. जळगावहून चोपड्याला प्रचारासाठी ते जात असताना वाटेत ममुराबाद गावाजवळ अचानक त्यांची प्रकृती बिघडली. कार्यकर्त्यांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
प्रभाकर सोनवणे यांच्या प्रकृतीत सध्या सुधारणा असून ॲज्निओप्लास्टी करण्यात आली आहे. प्रकृती स्थिर असून त्यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच वडील प्रचारात सक्रिय होतील, अशी माहिती त्यांचे पुत्र दिनेश सोनवणे यांनी दिली.
सोनवणे हे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून शिवसेनेत दाखल झाले असून २०१९ मध्येही त्यांनी चोपड्यातून निवडणूक अपक्ष उमेदवारी करीत लढवली होती.