कोल्हापुरात चार घरफाळा थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई
schedule28 Mar 24 person by visibility 486 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : विभागीय कार्यालय क्रं.1 गांधी मैदान अंतर्गत महाद्वार रोड येथील कमर्शियल कॉम्प्लेक्स मधील दिलीप जोतीराव पाटील यांचे चार स्वमालकीचे दुकान गाळयाची थकबाकी असलेने गुरुवारी त्यांचे चारही दुकान गाळे सिल करण्यात आले. या चारही दुकानगाळयांची 5 लाख 9 हजार 417 इतकी थकबाकी आहे.
महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाने शहरातील मिळकतकर थकबाकीदारांना थकबाकीचे दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एक रक्कमी भरणा केल्यास दंडव्याजामध्ये सवलत योजना जाहीर केली आहे. या सवलत योजनेचे शेवटचे तीन दिवस राहिले असून जे मोठे थकबाकीदार आहेत अशा मिळकत धारकांवर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. आज राजारामपूरी 2 री गल्ली येथील तीन मिळकती सिल करण्यास गेले असता गाळेधारकाने संपूर्ण थकबाकी असलेले 21 लाख रुपये जागेवर भरणा केला. तसेच विभागीय कार्यालय क्रं.4 अंतर्गत हॉटेल पलश व मनीपूरम गोल्ड यांनी थकीत 10 लाख रुपये वसुल करण्यात आले. शुक्रवार दि.29 व शनिवार, दि.30 मार्च व रविवार दि.31 मार्च 2024 रोजीही अशा प्रकारची जप्तीची घरफाळा विभागाच्यावतीने करण्यात येणार आहे.
तरी शहरातील थकबाकीदार व चालू मागणी असणा-या मिळकतधारकांनी आपला घरफाळा भरून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात आले होते.