डीकेटीईचे एन.एस.एस. शिबीरामध्ये ‘महिलांच्या आरोग्याविषयी’ जनजागृती
schedule23 Jan 25 person by visibility 345 categoryशैक्षणिक
इचलकरंजी : येथील डीकेटीर्ई सोसायटीच्या टेक्स्टाईल ऍन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट, इचलकरंजीचे ‘राष्ट्रीय सेवा योजना’ चे शिबीर तारदाळ येथे नुकतेच यशस्वीरीत्या संपन्न झाले आहे. या शिबीरामध्ये सुमारे सत्तरहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. हे शिबीर यावेळी लक्षवेधी ठरले ते ’कॅन्सरविषयी’ या अभियानाने. देशाची वाटचाल ही आरोग्यविषयी जनजागृतीकडे होत असल्याने गावातील महिलांच्यामध्ये आरोग्यविषयी जनजागृती व्हावी व भविष्यात महिलांनी आपल्या आरोग्यविषयी सतर्क रहावे या उददेशाने डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनीनी गावातील महिलांना एकत्र करुन माहिती दिली व त्यांचे मनोरंजन खेळही घेतले.
विद्यार्थ्यांनी आरोग्य विषयी माहिती घेणारी प्रश्नावली तयार करण्यात आली होती, या प्रश्नावलीच्या आधारे विद्यार्थ्यांनी पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, मातृवंदन योजना, मोठमोठया हॉस्पीटलमध्ये कॅशलेस व्यवहार, स्मार्ट फोनवरुन इमरजन्सी माहिती कशी उपलब्ध करावी इ. माहिती घरोघरी जावून देण्यात आली. यावेळी तारदाळकर महिलांनी विद्यार्थींनीशी खूपच आपुलकी दाखवत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. तारदाळ ग्रामपंचायतीच्या सहकार्याने केलेल्या या जनजागृतीचा गावासाठी खूपच उपयोग होणार आहे. या शिबीराच्या आयोजना बद्दल महिलांच्यातून समाधान व्यक्त केला जात होता. तसेच या एनएसएस कॅम्प दरम्यान मंदीरा पासून, स्मशानापर्यंत अनेक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आले.
एनएसएस कॅम्पचे उदघाटन तारदाळ डे.सरपंच मृत्यजंय पाटील व माजी डे. सरपंच सुधाकर कदम यांच्या हस्ते झाले. संचालिका प्रा. डॉ.एल. एस.आडमुठे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार आरोग्यविषयी मोहीम राबवण्यात आली. या शिबीरात विद्यार्थ्यांची दिनचर्या प्रा. नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यायामाने सुरु होई मग श्रमदान, स्वच्छता, इ. कामे करत दुपारी बौद्धिक सत्र सुरु होई त्यात या वेळी विविध विषयांवर चर्चासत्र होत असे त्यानंतर प्रबोधन होत असे. एनएसएस प्रमुख प्रा.एस.जी. कानिटकर यांनी विविध विषयावर व्याख्याने आयोजित केली. या सर्व कार्यक्रमांतून स्वागतापासून आभारापर्यंत सर्व बाजू विद्यार्थी सांभाळत होते व आपल्या वक्तृत्वकलेचा विकास करीत होते. शिबीराच्या समारोपाला अनेक विद्यार्थ्यांनी आपली कला व मनोगते सादर केली.
सदर शिबीरास संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे व सर्व ट्रस्टी यांचे मार्गदर्शन लाभले. सदर शिबीर हे डॉ रतन नाईकनवरे यांच्या प्रमुख उपस्थित सहकार्यांसवे पूर्ण केले. तसेच विद्यार्थी प्रमुख सिध्दांत सावळवाडे, प्रथमेश पाटील, सानिया चव्हाण, प्रतिक्षा पाटील यांनी संपूर्ण संयोजनात मदत केली.