एचएसआरपी बसविण्यास 30 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ
schedule26 May 26 person by visibility 74 categoryराज्य
कोल्हापूर : शासनाकडून 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) परिवहन आयुक्त कार्यालयाने 30 जून 2026 पर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे.
1 जुलै पासून उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) नसलेल्या जुन्या व नवीन वाहनांवर वायुवेग पथकाव्दारे (Flying Squad) कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. मात्र, ज्यांनी 30 जून 2026 पर्यंत रीतसर ॲपाइंटमेंट घेतली आहे. त्यांना यातून सवलत मिळेल.
HSRP नसलेल्या वाहनांचे हस्तांतरण, कर्ज बोजा या कामांवरील निर्बधांसह आता पुननोंदणी, वाहनात बदल आणि परवाना नूतनीकरण (Permit Renewal) या सारखी महत्वाची कामेही थांबवण्यात येणार आहेत. नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी dyccomp.tpt-mh@gov.in या ई-मेलवर संपर्क साधवा, असे आवाहन इचलकरंजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले.