SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
किणी-हंदळेवाडीत शेततळ्यात बुडून तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू; आरोग्य सुविधेअभावी ग्रामस्थांचा संताप27 पर्यंत दूधगंगा नदीच्या दोन्ही तीरावरील उपसांबदी'गोकुळ' निवडणूक रणधुमाळीला सुरुवात; मतदार यादी निश्चितीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीरहलगर्जीपणा खपवून घेणार नाही; घरफाळा वसुलीसाठी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांचे 'ॲक्शन मोड'मध्ये आदेशकोल्हापूर महापालिका वर्कशॉपमधील स्क्रॅपचा तातडीने लिलाव करा; सभापती विशाल शिराळे यांचे अधिकार्‍यांना कडक निर्देशवस्तूंच्या मनमानी एमआरपी आणि वाढत्या किमतीविरोधात ग्राहक पंचायतीचे कोल्हापुरात आंदोलन; जिल्हाधिकार्‍यांना निवेदनकोल्हापुरात इंधनवाढ व महागाईविरोधात शिवसेना (UBT) आक्रमक; कोल्हापूर-हुपरी रस्त्यावर 'रास्ता रोको' करत तीव्र निदर्शनेचालुक्याज स्पोर्ट्स अकॅडेमीकडून धनुर्विद्या चॅम्पियनशिपचे दिमाखात आयोजन; खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसादकोरे अभियांत्रिकीत वार्षिक गुणगौरव सोहळा उत्साहात महिन्यापूर्वी सुनावणी झालेल्या दूध संस्थांचे निकाल द्या; गडहिंग्लज तालुक्यातील संस्थांची मागणी

जाहिरात

 

किणी-हंदळेवाडीत शेततळ्यात बुडून तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू; आरोग्य सुविधेअभावी ग्रामस्थांचा संताप

schedule25 May 26 person by visibility 61 categoryगुन्हे

कोल्हापूर  : चंदगड तालुक्यातील किणी-हंदळेवाडी येथे सोमवारी दुपारी शेततळ्यात बुडून तीन अल्पवयीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. धनुष्का पुंडलिक सांबरेकर (हुंदळेवाडी), स्वराली जयवंत नाईक (होसुर) आणि रिया चंद्रकांत सांबरेकर (हुंदळेवाडी) अशी मृत मुलींची नावे आहेत.

शेततळ्याकाठी खेळत असताना हा अपघात घडला. सायंकाळी एका व्यक्तीला तिथे एक लहान मुलगा एकटाच उभा असलेला दिसला, त्यानंतर शोध घेतला असता तिन्ही मुली पाण्यात बुडाल्याचे समोर आले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.


दरम्यान, या दुर्घटनेमुळे स्थानिक आरोग्य यंत्रणेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कोवाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असूनही तिथे शवविच्छेदनाची (पोस्टमार्टम) सुविधा उपलब्ध नाही. यामुळे मृतदेह तब्बल ३० किलोमीटर दूर असलेल्या चंदगड ग्रामीण रुग्णालयात न्यावे लागले. या दुरवस्थेमुळे शोकाकुल नातेवाईकांना प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला.

कोवाडसारख्या मध्यवर्ती ठिकाणी तातडीने पोस्टमार्टम सुविधा सुरू करावी, अशी तीव्र मागणी आता ग्रामस्थांमधून केली जात आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes