ख्रिस्ती दफनभूमीसाठी जागा निश्चित करा
schedule06 Dec 25 person by visibility 66 categoryसामाजिक
कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या तिसऱ्या विकास योजनेचे काम सुरू आहे. शहरातील सर्व इमारती, जागांच्या सर्वेक्षणाचा टप्पा पूर्ण झाला असून पुढील टप्प्यात शहराच्या विकासासाठी आवश्यक सोयी-सुविधांची आरक्षणे निश्चित केली जाणार आहेत.
शहरातील ख्रिस्ती समाजाची लोकसंख्या लक्षणीय असून सध्या कदमवाडी येथील ख्रिस्ती दफनभूमी ही पूर्ण भरलेली आहे. भविष्यातील लोकसंख्या वाढ, स्थिर मृत्यू दर आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने दफनभूमी साठी योग्य व वैज्ञानिक नियोजन गरजेचे आहे.
त्यामुळे दफनभूमीसाठी योग्य, प्रवेशसुलभ व नगररचना निकषांना पूरक असा स्वतंत्र जागा विकास योजनेत निश्चित करावी अशी मागणी आम आदमी पार्टीने नगर रचना उपसंचालक दिलीप कदम यांच्याकडे केली.
यावेळी ख्रिस्ती समाजाच्या प्रतिनिधिंनी दफनभूमीचा प्रश्न गंभीर बनत चालला असून यावर लवकर निर्णय व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
बैठकीस आप चे शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, वायल्डर मेमोरियल चर्चचे सचिव संदीप थोरात, आशुतोष बेडेकर, मनीषा गायकवाड, सचिन मालप आदी उपस्थित होते.