साळोखे नगर येथे पिरॅमल स्वास्थ फाउंडेशन व स्टार हेल्थ इन्शुरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार हेल्थ डॉक केंद्राचे उद्घाटन
schedule06 Dec 25 person by visibility 81 categoryआरोग्य
कोल्हापूर : साळोखे नगर येथे पिरॅमल स्वास्थ फाउंडेशन व स्टार हेल्थ इन्शुरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार हेल्थ डॉक केंद्राचे उद्घाटन आज शनिवारी सहा डिसेंबर रोजी उत्साहात पार पडले. केंद्राचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी उत्तम मदने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पिरॅमल स्वास्थ फाउंडेशनचे यशवंत ठाकरे (स्टार इन्शुरन्स) यांची प्रमुख उपस्थिती होती.
या केंद्रात रुग्णांना डॉक्टरांचा सल्ला, मधुमेह, उच्च रक्तदाब, सामान्य बालरोग, दमा, रक्ताची आणि लघवीची साखरेसाठी तपासणी, ताप, खोकला आणि सर्दी, अतिसार, गर्भधारणा चाचणी, किरकोळ आजार, हिमोग्लोबिन चाचणी, आदी वैद्यकीय सेवा केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच काटेकोरपणे प्रदान केल्या जाणारआहेत.
सर्व तपासण्या वैद्यकीय सल्ला व औषधे पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहेत या प्रकल्पात डॉ. आदित्य दुबे, रागिणी ननावरे, वैष्णवी चौगुले, अस्मिता पाटील, प्रकल्प समन्वयक सुनील मोरे हे काम पाहत आहे. सुट्ट्या वगळता क्लिनिक सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होणार आहे. याचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केंद्राद्वारे करण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमात समाजसेवक, परिसरातील नागरिक उपस्थित होते.