दंतवैद्यक महाराष्ट्र राज्य संघटनेत डॉ. अभिजित वज्रमुष्टी, डॉ. दिग्विजय पाटील पदाधिकारी
schedule18 Dec 25 person by visibility 89 categoryआरोग्य
कोल्हापूर : इंडियन डेंटल असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखेचे पदाधिकारी म्हणून डॉ अभिजीत वज्रमुष्टी व डॉ दिग्विजय पाटील यांची अनुक्रमे राज्य सहाय्यक सचिव व राज्य निमंत्रक सामुदायिक दंत आरोग्य (सीडीएच) म्हणून निवड झाली.
नुकतीच 64 वी वार्षिक राज्य परिषद छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथील सी एस एम एस एस दंतवैद्यक महाविद्यालयात पार पडली यावेळी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कोल्हापुरातील या सुप्रसिद्ध दंतवैद्यांची बहुमताने निवड झाली. या परिषदेला राज्यभरातून हजाराहून अधिक दंतवैद्य हजर होते.





