नॅशनल हॅंडीक्राफ्ट डेव्हलमेन्ट कार्यक्रमांचे 10 रोजी आयोजन
schedule09 Feb 26 person by visibility 86 categoryराज्य
कोल्हापूर : वस्त्रोद्योग मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत विकास आयुक्त (हस्तकला) कार्यालय, पश्चिम विभागीय कार्यालय, मुंबई यांच्यावतीने "युजर नॅशनल हँडीक्राफ्ट डेव्हलपमेंट प्रोग्राम" चे आयोजन दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता हॉटेल रेडियंट, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
या एकदिवसीय परिसंवादाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. तसेच वरिष्ठ सहायक निदेशक (हस्तकला) चंद्रशेखर सिंह यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या परिसंवादामध्ये कोल्हापुरी चप्पल कारागीरांना GI मानांकन प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 5 राज्यांतील GI मानांकन प्राप्त झालेले हस्तकला कारागीर उपस्थित राहणार असून त्यांच्या पारंपारिक हस्तकला व सांस्कृतिक वारसातील अमुल्य योगदानाचा सन्मान करण्यात येणार आहे.
तसेच देशातील 4 नामवंत तज्ञ उपस्थित कारागिरांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती कोल्हापूरचे सहायक निदेशक (ए.एंड सी) पल्लवी जांभुळकर यांनी दिली आहे.