दिपावली उत्सवाच्या कालावधीत फेरीवाले, दुकानदारांनी पट्ट्याच्या आतच व्यवसाय करावा, अन्यथा...
schedule23 Oct 24 person by visibility 240 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : शहरामध्ये दिपावली उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बिनखांबी मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, ताराबाई रोडवर फेरीवाले, दुकानदार स्टॉलधारक यांची व नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी होत असते. या ठिकाणी महापालिकेने फेरीवाले व दुकानदारांना पट्टे मारुन दिले आहेत.
या रस्त्यांवर वाहतुकीच्या पट्ट्याच्या आतच सदर व्यवसायिकांनी व्यवसाय करावा. या रस्त्यावर ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहनास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही या अनुषंगाने फेरीवाल्यांनी नियोजन बध्द व शिस्तबध्द पध्दतीने व्यवसाय करण्याचा आहे.
जे फेरीवाले व दुकानदार स्टॉलधारक, रस्त्यावर वाहनास व नागरिकांस अडथळा होईल असा व्यवसाय करताना आढळून आल्यास संबंधीतांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाई केली जाईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी असे आवाहन अतिक्रमण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.