SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
परिक्षा कालावधीत 100 मीटर परिसरात इलेक्ट्रॉनिक वस्तू बाळगण्यास बंदीतिलारी घाटातील बेवारस महिलेच्या खुनाचा उलगडा; कोल्हापूर पोलिसांच्या कामगिरीवर ५० हजारांचे बक्षीसकोल्हापूरचे किशोर घाटगे यांची 'ग्राहक संरक्षण समिती'च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवडआंतरराष्ट्रीय खेळ दिन: बालपणाचा अविभाज्य आनंद आणि हक्ककोल्हापूर महानगरपालिका : गुरुवारी ‘जनता दरबार’ — महापौर रुपाराणी निकम यांचा उपक्रमराज्यातील एमआरआय, सीटी स्कॅन व पीईटी सीटी स्कॅन प्रकल्पांना गती देणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफडॉग शेल्टर, पथदिवे व जनरल बजेटमधील विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण निर्णयबिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार चौक परिसरात महापालिकेची धडक अतिक्रमण कारवाईॲपद्वारे खत खरेदीची सक्ती रद्द करावी; आमदार सतेज पाटील यांची मागणी..चर्मकार समाजासाठी संत रोहिदास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

जाहिरात

 

कोल्हापूरचे किशोर घाटगे यांची 'ग्राहक संरक्षण समिती'च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड

schedule11 Jun 26 person by visibility 214 categoryसामाजिक

कोल्हापूर : कोल्हापूर येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे  किशोर जयवंतराव घाटगे यांची भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स अंतर्गत नोंदणीकृत 'माणुसकी सोशल व ग्राहक संरक्षण फाउंडेशन' संचालित 'ग्राहक संरक्षण समिती'च्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे अधिकृत पत्र संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आले.

ही समिती केंद्र व राज्य शासनाला सहकार्य करून ग्राहक हक्क संरक्षण, व्यापक जनजागृती आणि विविध सामाजिक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने कार्यरत आहे. उपभोक्ता संरक्षण अधिनियम १९८६/२०१९ नुसार ग्राहकांना त्यांचे हक्क मिळवून देणे, कायद्याची माहिती देणे आणि सामाजिक कार्य करणे हे या समितीचे मुख्य कार्यक्षेत्र आहे.

या महत्त्वपूर्ण समितीत राज्यातील नामांकित निवृत्त न्यायाधीश, अनुभवी डॉक्टर्स, ज्येष्ठ वकील आणि ग्राहक संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या निष्ठावान सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. संपूर्ण भारतभर विस्तार असलेल्या या समितीमध्ये  किशोर घाटगे यांची निवड ही त्यांच्या ग्राहक संरक्षण क्षेत्रातील सखोल अभ्यास, सामाजिक कार्याची आवड आणि स्वयं-इच्छाशक्ती पाहून करण्यात आली आहे.

या समितीच्या माध्यमातून सरकारी, निमसरकारी आणि खाजगी क्षेत्रातील ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करणे आणि त्यांना कायदेशीर संरक्षण मिळवून देण्यासाठी किशोर घाटगे प्रयत्नशील राहणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes