SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात १७ सप्टेंबरपासून लष्कर भरती मेळावालोकशाही दिनी 22 तक्रार अर्ज दाखलबालिंगा-चंबूखडीच्या मेन पाईपलाईनवरील 'महा-गळती'मुळे सलग दोन दिवस कोल्हापूर शहरातील काही भागात पाणी पूर्णपणे होणार गुल कोल्हापूर : शाहू क्लॉथ मार्केटमधील थकबाकी असलेले 60 गाळे सीलमहापालिका कामांना गती देत विभागीय स्तरावर निर्णयक्षमता वाढविण्याचे आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देशनाविन्यपूर्ण विचारातून उद्योगक्षेत्रातील संधीचा लाभ घ्या : डॉ. राकेश कुमार शर्माशिवाजी विद्यापीठात फुलले ‘कास’...!मुंबई उपनगर जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढकोरे अभियांत्रिकीत ‘मल्टी-बिझनेस मॉडेल इनोव्हेशन’वर आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे मार्गदर्शनविद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

जाहिरात

 

​"होमिओपॅथी, आयुर्वेद आणि योग महाविद्यालयांसह ग्रामीण आरोग्य पथक परिसरातील अत्यावश्यक सुविधा जलदगतीने उभाराव्यात."

schedule18 Jul 26 person by visibility 400 categoryआरोग्य

▪️वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना
▪️शेंडा पार्कमधील बैठकीत घेतला कामाच्या प्रगतीचा आढावा
       
कोल्हापूर : मौजे सांगाव येथील शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय, पिंपळगाव खुर्द येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय, उत्तुर येथील शासकीय योगा महाविद्यालय व रुग्णालय या महाविद्यालयांसह कागल येथील ग्रामीण आरोग्य पथक परिसरातील अत्यावश्यक सुविधा जलदगतीने उभारा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. या परिसरातील पाणी, वीज, रस्ते, एसटीपी प्लांट या अत्यावश्यक सुविधांबाबत सतर्क रहा, असेही ती म्हणाले.
           
मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेंडा पार्कमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरीतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.                  
यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी प्रगतीपथावर असलेली सर्वच कामे तातडीने आणि वेळेत पूर्ण करण्याच्याही सूचना दिल्या. पाणी, वीज, रस्ते, एसटीपी प्लांट या अत्यावश्यक सोयी-सुविधांकडे बारकाईने लक्ष देण्याच्या आणि तातडीने प्रस्ताव पाठवण्याच्या सूचनाही  मुश्रीफ यांनी दिल्या.           
           
आढावा बैठकीला राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, शासकीय आयुर्वेदिक व होमिओपॅथी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिजीत अहिरे, उत्तूर येथील शासकीय योगा व निसर्गोपचार महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. भाग्यश्री खोत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तुषार बुरूड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मिरजकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. हजारे,  शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाचे बांधकाम सल्लागार  तायवाडे-पाटील, होमिओपॅथी महाविद्यालयातील एअरबॉन्ड लिमिटेडचे  शेळके आदी अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes