SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरूआंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य दिन: जागतिक शांतता आणि सुरक्षेचा पायाछत्रपती शिवाजी महाराज हे युध्दाभ्यास आणि रणनीतीमध्ये अलौकिक क्षमतेचे योद्धे : कादंबरीकार मेधा देशमुख भास्करनआरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर शिक्षकांसाठी 'आरोग्य कवच' योजना राबवणार : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरभरती परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित व विश्वासार्ह करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठितकोल्हापुरात दहीहंडी उत्सवाचा अभूतपूर्व थरारज्ञानाचा खरा ठेवा: राष्ट्रीय पुस्तक वाचन दिनडीवायपी इंजिनिअरिंग साळोखेनगरच्या गणेश राठोड, रोहीत बारवाडे यांना पीएचडी डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये 'मायक्रोसॉफ्ट'कडून ‘कॅम्पस टू कॉर्पोरेट’ची यशस्वी चर्चा

जाहिरात

 

विद्यापीठात मोडी लिपी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू

schedule07 Sep 26 person by visibility 185 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र आणि इतिहास अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या मार्फत ६ महिने कालावधीच्या ‘मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रमा’साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना २८ सप्टेंबरपर्यंत प्रवेश घेता येईल. या अभ्यासक्रमासाठी किमान शैक्षणिक पात्रता पदवी आवश्यक आहे.

शिवपूर्वकाळापासून ते स्वातंत्र्यकाळापर्यंत प्रशासनाची तसेच दैनंदिन कामकाजासाठी मराठी भाषे बरोबरच मोडी लिपीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. त्यामुळे या कालखंडातील इतिहास समजून घेण्यासाठी, संशोधनासाठी आणि प्रशासकीय दस्तऐवज उलगडण्यासाठी मोडी लिपीचे ज्ञान असणे अत्यंत गरजेचे आहे.

सध्याच्या काळात सामाजिक शास्त्रांच्या विद्यार्थ्यांपुढे रोजगाराची समस्या असताना, मोडी लिपीसारखे कौशल्य रोजगाराचे नवे मार्ग खुले करू शकते. १९६० पूर्वीच्या शेतीविषयक नोंदी, जन्म-मृत्यूच्या नोंदी, खरेदीखते आणि जुने न्यायालयीन दावे यांसारखी सर्व महत्त्वाची कागदपत्रे मोडी लिपीतच उपलब्ध आहेत. या कागदपत्रांचे लिप्यांतर करून देण्याचे काम करून व्यावसायिकदृष्ट्या उपजीविकेचे साधन निर्माण करता येते.

इतिहास काळातील कोणत्याही विषयावर संशोधन करायचे असेल तर मोडी लिपी अवगत असणे अत्यंत गरजेचे आहे. या अभ्यासक्रमाचा संशोधक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्राच्या समन्वयक डॉ. नीलांबरी जगताप यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी (०२३१) २६०९४६७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes