राधानगरी तालुक्यात गव्याची शेतकऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यु
schedule29 Aug 24 person by visibility 366 categoryगुन्हे
कोल्हापूर : खिंडी व्हरवडे (ता. राधानगरी) येथील बळवंत सखाराम शेटके (वय 50) या शेतकऱ्याला बुधवारी गवारेड्याने धडक देवून गंभीर जखमी केले होते. त्याांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याांचा गुरूवारी सकाळी मृत्यु झाला.
बळवंत शेटके बुधवारी सकाळी गावालगतच्या शेतामध्ये जनावराच्या चाऱ्यासाठी गवत कापण्यासाठी गेले होते. गवताचा भारा डोक्यावरून घेवून येत असताना गवारेड्याने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले होते
त्यांना उपचारासाठी सीपीआर हॉस्पीटलमध्ये दाखल केले आहे. त्यंच्यावर सीपीआरमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी शेटके याांचा मृत्यु झाला.