सरनोबतवाडीत गॅरेजना आग... सुमारे पस्तीस लाखाचे नुकसान
schedule22 Dec 25 person by visibility 78 categoryगुन्हे
कोल्हापूर - सरनोबतवाडी येथील आंबेडकरनगर परिसरात असणाऱ्या गॅरेजना आग लागली होती. तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक आणि इतर साहित्य मिळून सुमारे 35 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
सरनोबतवाडी येथील आंबेडकरनगर परिसरात असणाऱ्या मनोहर सुतार, अकबर पठाण आणि वैभव जाधव या तिघांची एकमेकाला लागून ट्रक रिपेअरी, स्प्रे पेंटिंग आणि ट्रकच्या बॉडीचे काम करणारी तीन गॅरेज आहेत. आज सकाळी सुमारास या गॅरेज मधून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ याची वर्दी अग्निशामन दलाला दिली.
कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तब्बल तीन तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रक आणि इतर साहित्य मिळून सुमारे 35 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.





